TRENDING:

केवळ आजार नाही तर नशिबाचे संकेत! नखांवरील पांढरे डाग देतात 'या' मोठ्या बदलांचे इशारे; तुमच्याही नखांवर आहेत का?

Last Updated:
मानवी शरीरावरील खुणा, तीळ आणि अगदी नखांचा आकारही आपल्या भविष्याबद्दल बरेच काही सांगून जातो. अनेकदा आपण नखांवर उमटलेल्या पांढऱ्या ठिपक्यांकडे आरोग्याची समस्या म्हणून पाहतो, पण सामुद्रिक शास्त्र आणि हस्तरेखा शास्त्रानुसार या खुणा अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात.
advertisement
1/7
नखांवरील पांढरे डाग देतात 'या' मोठ्या बदलांचे इशारे; तुमच्याही नखांवर आहेत का?
मानवी शरीरावरील खुणा, तीळ आणि अगदी नखांचा आकारही आपल्या भविष्याबद्दल बरेच काही सांगून जातो. अनेकदा आपण नखांवर उमटलेल्या पांढऱ्या ठिपक्यांकडे आरोग्याची समस्या म्हणून पाहतो, पण सामुद्रिक शास्त्र आणि हस्तरेखा शास्त्रानुसार या खुणा अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. नखांवरील हे पांढरे डाग तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुख-समृद्धीचे आणि प्रगतीचे संकेत देतात.
advertisement
2/7
अंगठ्याचे नख : अंगठ्याच्या नखावर पांढरा डाग असणे खूप शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा व्यक्तींना त्यांच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक जीवनात मोठे यश मिळते. तसेच, हे लोक व्यापारात खूप प्रगती करतात आणि त्यांना समाजात मान-सन्मान प्राप्त होतो.
advertisement
3/7
तर्जनी : अंगठ्याशेजारील बोटाच्या नखावर पांढरा डाग असेल, तर तो व्यावसायिक यशाचा प्रतीक आहे. अशा व्यक्तींना नोकरीत बढती मिळते किंवा व्यवसायात अचानक मोठा नफा होतो. हे लोक अत्यंत आनंदी आयुष्य जगतात.
advertisement
4/7
मधले बोट : मधल्या बोटाचा संबंध शनी ग्रहाशी असतो. या बोटाच्या नखावर पांढरा डाग असल्यास लवकरच प्रवासाचे योग जुळून येतात. हा प्रवास व्यवसायानिमित्त किंवा पर्यटनासाठी असू शकतो आणि तो लाभदायक ठरतो. याला धनलाभाचे संकेतही मानले जाते.
advertisement
5/7
अनामिका : अनामिका बोटाच्या नखावरील पांढरा डाग ऐश्वर्य आणि प्रसिद्धीचे लक्षण आहे. अशा व्यक्तींना सरकारी कामात यश मिळते आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते. समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होण्याचे हे संकेत आहेत.
advertisement
6/7
करंगळी : सर्वात लहान बोटाच्या नखावर पांढरा डाग असणे हे करिअरमधील यशाचे लक्षण आहे. शास्त्रानुसार, अशा लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते आणि त्यांचे रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण होतात.
advertisement
7/7
आरोग्याचा आरसा: सामुद्रिक शास्त्रासोबतच वैद्यकीय शास्त्राचा विचार केल्यास, नखांवरील गुलाबी रंग आणि गुळगुळीतपणा शुभ मानला जातो. मात्र, नखावर काळे डाग असणे अशुभ मानले जाते, जे जीवनातील संघर्षाचे लक्षण असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
केवळ आजार नाही तर नशिबाचे संकेत! नखांवरील पांढरे डाग देतात 'या' मोठ्या बदलांचे इशारे; तुमच्याही नखांवर आहेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल