TRENDING:

सरकारचा इशारा! लगेच डिलीट करा हे अ‍ॅप्स, बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

Last Updated:
सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन यूझर्सना त्यांच्या फोनमधून काही अॅप्स काढून टाकण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.
advertisement
1/7
सरकारचा इशारा! लगेच डिलीट करा हे अ‍ॅप्स, बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
भारत सरकारने स्मार्टफोन यूझर्सना सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) लोकांना त्यांच्या मोबाइल फोनमधून काही धोकादायक अ‍ॅप्स त्वरित काढून टाकण्याचे आणि ते पुन्हा इंस्टॉल न करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
2/7
विशेषतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स टाळा : सरकारने म्हटले आहे की अनेक स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स, जसे की AnyDesk, TeamViewer, QuickSupport, इत्यादींचा वापर सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करत आहेत. हे अ‍ॅप्स तुमच्या फोनवर रिअल-टाइम अ‍ॅक्सेस दुसऱ्याला देऊ शकतात, जे तुमच्या बँकिंग क्रियाकलाप, OTP आणि पर्सनल माहिती सहजपणे पाहू शकतात.
advertisement
3/7
फसवणूक कशी होते? : जेव्हा एखादा यूझर स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप इन्स्टॉल करतो तेव्हा हे अ‍ॅप्स अनेक प्रकारच्या परमिशन मागतात. बहुतेक यूझर्स त्यांना विचार न करता परमिशन देतात. यानंतर, गुन्हेगार यूझर्सची स्क्रीन लाईव्ह पाहू शकतात आणि बँकिंग व्यवहारादरम्यान OTP आणि पासवर्डसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात.
advertisement
4/7
सरकारी सल्ला :सरकारने स्पष्ट केले आहे की तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही अ‍ॅप्स आधीच इंस्टॉल असतील तर ते त्वरित हटवा. तसेच, जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून बँकिंग किंवा इतर संवेदनशील सेवा वापरत असाल तर हे अ‍ॅप्स पुन्हा डाउनलोड करू नका.
advertisement
5/7
या खबरदारी घ्या: कोणत्याही अज्ञात लिंक किंवा कॉलद्वारे अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. विश्वसनीय संस्थेने आवश्यक असल्याशिवाय स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नका. सोशल मीडियावर तुमची गोपनीयता सेटिंग्ज मजबूत करा आणि तुमची पर्सनल माहिती मर्यादित प्रमाणात शेअर करा. बँकिंग सर्व्हिस वापरताना कोणालाही स्क्रीन अ‍ॅक्सेस देऊ नका.
advertisement
6/7
सायबर गुन्ह्याची तक्रार कशी करावी? : तुम्ही कोणत्याही सायबर फसवणुकीचे बळी ठरलात तर www.cybercrime.gov.in पोर्टलला भेट देऊन किंवा 1930 हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्वरित तक्रार नोंदवा.
advertisement
7/7
सर्व नागरिकांची ऑनलाइन सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सरकारचा हा इशारा जारी करण्यात आला आहे. तंत्रज्ञानासोबतच सावधगिरी देखील आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
सरकारचा इशारा! लगेच डिलीट करा हे अ‍ॅप्स, बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल