TRENDING:

Alcohol : दारू पिऊन गाडी चालवताना पोलीस श्वासातून अल्कोहोल कसं Detect करतात? ब्रीथलायझर मशीन नक्की कसं काम करतं?

Last Updated:
breathalyzer machine working principle : मद्यपान करून गाडी चालवणं (Drunk and Drive) हा केवळ गुन्हा नसून तो स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळ आहे. पण पोलीस नेमकी कोणती यंत्रणा वापरतात आणि तुमच्या शरीरातली दारू कशी पकडली जाते? जाणून घेऊया यामागचं रंजक विज्ञान.
advertisement
1/9
पोलीस श्वासातून अल्कोहोल कसं Detect करतात? ब्रीथलायझर मशीन नक्की कसं काम करतं?
शनिवार-रविवारची रात्र असो किंवा लग्नसराईचा मोसम किंवा ख्रिसमस-नवीन वर्षांची पार्टी मित्र-मैत्रिणींसोबतच्या पार्ट्यांमध्ये मद्यपान (Alcohol) करणं अनेकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. पार्टी संपवून आनंदाने घरी परतताना रस्त्यात पोलिसांची 'नाकाबंदी' दिसते आणि चालकाच्या मनात धडधड सुरू होते. कारण इथे एका डिटेक्टर मशीनमधून टेस्ट केलं जातं की तुम्ही ड्रिंक घेतली आहे की नाही ते. अशावेळी लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न तयार होतात. "मी तर फक्त एकच पेग घेतला आहे, पोलिसांना कसं समजणार?" किंवा "तोंड धुतलं तर वास येणार नाही," बडीसौफ किंवा आणखी एखादी मेंथोलची गोळी खाल्ली तर तोंडात दारुचा वास रहाणारच नाही मग तो मशीनमध्ये ही कळणार नाही. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात.
advertisement
2/9
पण, आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानासमोर या युक्त्या फेल ठरतात. मद्यपान करून गाडी चालवणं (Drunk and Drive) हा केवळ गुन्हा नसून तो स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळ आहे. पण पोलीस नेमकी कोणती यंत्रणा वापरतात आणि तुमच्या शरीरातली दारू कशी पकडली जाते? जाणून घेऊया यामागचं रंजक विज्ञान.
advertisement
3/9
ड्रंक अँड ड्राईव्ह: पोलिसांच्या ब्रीथलायझरसमोर तुमची लबाडी का टिकत नाही? पाहा कसं काम करतं अल्कोहोल डिटेक्टजेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते, तेव्हा अल्कोहोलचे पचन अन्नासारखे होत नाही. ते थेट रक्तात शोषले जाते. रक्ताभिसरणाद्वारे हे अल्कोहोल संपूर्ण शरीरात, अगदी फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. जेव्हा आपण श्वास सोडतो, तेव्हा फुफ्फुसांमधील अल्कोहोलचे काही अंश हवेवाटे बाहेर पडतात. पोलीस याच विज्ञानाचा वापर करून तुम्हाला पकडतात.
advertisement
4/9
1. ब्रीथलायझर चाचणी (Breathalyzer Test)रस्त्यावर पोलीस जे उपकरण तुमच्या तोंडासमोर धरतात, त्याला 'ब्रीथलायझर' म्हणतात.जेव्हा तुम्ही या मशीनमध्ये फुंकर मारता, तेव्हा तुमच्या श्वासातील अल्कोहोलच्या रेणूंची मशीनमधील रसायनांशी (Chemicals) अभिक्रिया होते. या अभिक्रियेमुळे मशीनमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि त्यावरून तुमच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC - Blood Alcohol Concentration) स्क्रीनवर दिसते.भारतात कायदेशीर रित्या 100 ml रक्तात 30 mg पेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्यास तो गुन्हा मानला जातो.
advertisement
5/9
2. रक्ताची चाचणी (Blood Test)जर ब्रीथलायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळले किंवा चालकाने यंत्रावर संशय व्यक्त केला, तर पोलीस त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेतात. तिथे रक्ताची चाचणी केली जाते. ही चाचणी सर्वात अचूक मानली जाते कारण ती थेट रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजते. मद्यपान केल्यानंतर 6 ते 12 तासांनंतरही रक्ताच्या चाचणीत दारूचे अंश सापडू शकतात.
advertisement
6/9
3. लघवीची चाचणी (Urine Test)काही विशेष प्रकरणांमध्ये लघवीची चाचणी देखील केली जाते. दारू पिल्यानंतर सुमारे 12 ते 48 तासांपर्यंत लघवीमध्ये 'इथाइल ग्लुकुरोनाइड' (EtG) नावाचा घटक आढळतो, जो मद्यपानाचा पुरावा देतो.
advertisement
7/9
तोंड धुतल्याने फरक पडतो का?अनेक ड्रायव्हर्सना वाटतं की वेलची खाल्ली, माऊथवॉश वापरला किंवा पाणी पिलं तर पोलीस पकडू शकणार नाहीत. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. ब्रीथलायझर तुमच्या तोंडाचा वास मोजत नाही, तर तो तुमच्या फुफ्फुसातून येणाऱ्या हवेतील अल्कोहोल मोजतो. त्यामुळे तोंडाचा वास लपवून तुम्ही पोलिसांना फसवू शकत नाही.
advertisement
8/9
अल्कोहोलचा ड्रायव्हिंगवर होणारा परिणाममद्यपान केल्यामुळे मेंदूचा शरीरावरील ताबा सुटतो. तुमची निर्णय घेण्याची क्षमता मंदावते. समोरून एखादं वाहन येत असेल तर ब्रेक कधी दाबायचा, याचा अंदाज मेंदूला वेळेवर येत नाही, ज्यामुळे भीषण अपघात होतात.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Alcohol : दारू पिऊन गाडी चालवताना पोलीस श्वासातून अल्कोहोल कसं Detect करतात? ब्रीथलायझर मशीन नक्की कसं काम करतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल