LED बल्ब किती वीज वापरतो? 1 तास चालवल्यास किती येईल बिल?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का एक एलईडी बल्ब किती युनिट वीज वापरतो? तसेच LED बल्ब 1 तास चालवण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील? त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
advertisement
1/6

एका काळ होता जेव्हा प्रत्येक घरात ट्यूब लाईट दिसायच्या पण आता बहुतांश घरांमध्ये आपल्याला LED बल्ब पाहायला मिळतात. हे LED बल्ब सर्वात कमी उर्जा किंवा वीज वापरतात.
advertisement
2/6
त्यामुळे घर, ऑफिस, मोठे मॉल इत्यादी ठिकाणी एलईडी बल्ब वापरले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का एक एलईडी बल्ब किती युनिट वीज वापरतो? तसेच LED बल्ब 1 तास चालवण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील? त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
advertisement
3/6
वेगवेगळ्या वॉटचे एलईडी बल्ब बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणताही बल्ब खरेदी करू शकता. पण 10 वॅटच्या LED बल्ब बद्दल बोलायचं झालं तर किती खर्च येतो?
advertisement
4/6
10 वॅटचा एलईडी बल्ब एका तासात 0.01 युनिट वीज वापरतो. अशाप्रकारे तुम्ही एलईडी बल्ब दिवसभर म्हणजेच 24 तास चालू ठेवल्यास तो 0.24 युनिट वीज वापरतो.
advertisement
5/6
समजा तुम्ही LED बल्ब दररोज 12 तास चालू ठेवलात. जर तुम्ही 30 दिवस दररोज 12 तास एलईडी बल्ब लावला तर तो एकूण 3.6 युनिट वीज वापरेल.
advertisement
6/6
प्रत्येक राज्यात विजेचे दर वेगवेगळे आहेत. समजा तुमच्या राज्यात विजेचा दर 7 रुपये प्रति युनिट असेल तर तुम्हाला 30 दिवसांत 12 तासांसाठी 25.2 रुपये वीज बिल भरावं लागेल.