TRENDING:

तुमचा Laptop हॅक तर झाला नाहीये ना? या संकेतांवरुन लगेच व्हा सतर्क

Last Updated:
हॅकर्स तुमच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवतात आणि मग फसवणूक होते. अशा परिस्थितीत, फसवणुकीच्या पद्धती समजून घेणे गरजेचे आहे.
advertisement
1/6
तुमचा Laptop हॅक तर झाला नाहीये ना? या संकेतांवरुन लगेच व्हा सतर्क
देशात आणि जगात तंत्रज्ञानाची प्रगती वेगाने होत आहे. ऑफिसपासून शाळेपर्यंत प्रत्येक जगात तंत्रज्ञानाच्या वापराने काम खूप सोपे होतेय. मात्र वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेही वाढत आहेत. त्यांचे काम सोपे करण्यासाठी, लोक त्यांच्या कंप्यूटर किंवा स्मार्टफोनवर विचार न करता ॲप्स डाउनलोड करतात, त्यानंतर त्यांचा सर्व डेटा धोक्यात येतो.
advertisement
2/6
यासोबतच हॅकर्स तुमच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवतात आणि मग फसवणूक होते. अशा परिस्थितीत, फसवणुकीच्या पद्धती समजून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत काही महत्त्वाची माहिती शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या PC मध्ये कोणताही व्हायरस आला आहे की नाही हे जाणून घेऊ शकाल.
advertisement
3/6
एकदा व्हायरस आत गेल्यावर, तुमच्या फाइल्स आणि ॲप्स उघडण्यासाठी वेळ लागेल. लॅपटॉप किंवा कंप्यूटरचा परफॉर्मेंस कमी होईल. सतत पॉप-अप आणि स्पॅम दिसू लागतील. तुमचा लॅपटॉप लॉक होईल आणि तुम्ही त्यात अॅक्सेस करू शकणार नाही. हे मालवेअरमुळे होऊ शकते.
advertisement
4/6
होम पेजवरही बदल पाहिले जाऊ शकतात. तुमच्या सिस्टमवर अननोन प्रोग्राम चालू होतील. तुमच्या मेल अकाउंटमधून मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवले जाऊ शकतात. सिस्टमचे सुरक्षा सॉफ्टवेअर डिसेबल केले जाऊ शकते. लॅपटॉपची बॅटरी लवकर संपू शकते. तुमची सिस्टम सतत क्रॅश होऊ शकते. अनेक वेळा स्क्रीन फ्रीज झाल्याच्या तक्रारी येतात.
advertisement
5/6
कंप्यूटरवरुन व्हायरस काढून टाकणे शक्य आहे. तुम्ही कंप्यूटरमधून व्हायरस काढू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या तज्ञाची मदत घेऊ शकता. याआधी तुम्ही या टिप्स ट्राय करु शकता.
advertisement
6/6
अँटीव्हायरस किंवा अँटी-मालवेअर टूल डाउनलोड करा. इंटरनेटवरून सिस्टम डिस्कनेक्ट करा आणि सुरक्षित मोडमध्ये प्रवेश करा. डिव्हाइसवर धोकादायक ॲप्स तपासण्यासाठी टास्क मॅनेजर उघडा. तुमचा अँटीव्हायरस चालू करा आणि तुमचा कंप्यूटर व्हायरससाठी स्कॅन करा. नंतर सिस्टममधून कॅशे साफ करा आणि पुन्हा अपडेट करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
तुमचा Laptop हॅक तर झाला नाहीये ना? या संकेतांवरुन लगेच व्हा सतर्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल