TRENDING:

आर्यन खानच्या सिरीजची हवा, पण अडचणीत आला रणबीर कपूर, मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन!

Last Updated:
Ranbir Kapoor Controversy : आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि यात अभिनेता रणबीर कपूरही अडकला आहे.
advertisement
1/8
आर्यन खानच्या सिरीजची हवा, पण अडचणीत आला रणबीर कपूर, मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन
मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही सिरीज सध्या खूप चर्चेत आहे.
advertisement
2/8
या सिरीजच्या माध्यमातून आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने दिग्दर्शित केलेली ही पहिलीच सिरीज असली, तरीही त्याच्या या सिरीजचं खूप कौतुक होत आहे.
advertisement
3/8
बॉलिवूडचा खरा चेहरा या सिरीजमध्ये दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण, आता ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आणि यात अभिनेता रणबीर कपूरही अडकला आहे.
advertisement
4/8
एका सीनमध्ये रणबीरने सिगारेट ओढल्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
advertisement
5/8
या सिरीजमधील एका सीनमध्ये रणबीर कपूर कोणत्याही प्रकारची चेतावणी किंवा डिस्क्लेमर न देता ई-सिगारेट पिताना दिसला आहे. याबद्दल विनय जोशी नावाच्या एका व्यक्तीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली.
advertisement
6/8
या तक्रारीनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि मुंबई पोलिसांना या सिरीजच्या निर्मात्यांवर आणि रणबीर कपूरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
7/8
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनाही याबद्दल एक नोटीस पाठवली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, अशा गोष्टींमुळे तरुण पिढीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे यावर तातडीने बंदी घालण्यात यावी.
advertisement
8/8
भारतात १७ सप्टेंबर २०१९ पासूनच ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट निषेध अधिनियम २०१९’ नुसार, ई-सिगारेटची विक्री, खरेदी, उत्पादन किंवा जाहिरात केल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आर्यन खानच्या सिरीजची हवा, पण अडचणीत आला रणबीर कपूर, मुंबई पोलिसांनी घेतली ॲक्शन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल