'या' चुकांमुळे खराब होते शकते चार्जिंग स्पीड! अनेक तास चार्जिंगला लावुनही होत नाही चार्ज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आजकल अनेक फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या चार्जिंगला मॅक्सिमाइज करण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. असे न केल्यास तुमचा फोन अनेक तास चार्ज करुनही चार्ज होणार नाही.
advertisement
1/5

तुम्हाला तुमच्या फोनची चार्जिंग स्पीड मॅक्सिमाइज करायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एखादा डिव्हाइस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर त्यासाठी आवश्यक चार्जर आणि केबलची गरज पडेल. अनेकदा लोक कंपॅटिबल अॅक्सेसरीजचा वापर करत नाही. ज्यामुळे फोन चार्ज होण्याची स्पडी स्लो होते.
advertisement
2/5
आज आपण अशा चुकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे फोनच्या चार्जिंग स्पीडवर परिणाम होतो. तुम्हीही यामधून एखादी चूक करत असाल तर सुधारल्याने तुमचा फोन लवकर चार्ज होईल.
advertisement
3/5
योग्य अ‍ॅडॉप्टर आवश्यक : स्वस्त किमतींच्या आमिषाने बरेच लोक बाजारातून बनावट किंवा कमी दर्जाचे चार्जर खरेदी करतात. हे फोन चार्ज करतात, परंतु ते जास्त वेळ घेतात आणि बॅटरीवर नकारात्मक परिणाम करतात. म्हणून, नेहमी मूळ आणि कंपॅटिबल अ‍ॅडॉप्टर वापरा. तुम्ही एका प्रतिष्ठित ब्रँडचे हाय-वॅटेज चार्जर देखील खरेदी करू शकता, जे चार्जिंगला फास्ट करेल.
advertisement
4/5
केबलकडेही लक्ष देणे गरजेचे : तुम्ही एखादी स्वस्त किंवा खराब क्वालिटीची केबल वापरत असाल तरीही चार्जिंग स्लो होईल. तुमच्याजवळ ओरिजनल आणि कंपॅटिबल अडेप्टर आहे, पण केबल बनावट असेल तर फोन अजिबात स्पीडने चार्ज होणार नाही. या व्यतिरिक्त हे देखील लक्षात ठेवा की, लांब केबलने चार्जिंग स्लो होते. लांबीमुळे सिग्नल डिग्रेड होतात. यामुळे नेहमी फोनला एक छोटी आणि हाय-क्वालिटीच्या केबलने चार्ज करा.
advertisement
5/5
चार्जिंग कंडीशननेही पडतो फरक : कधीही आपले डिव्हायसेस गरम ठिकाणी किंवा थेट उन्हात ठेवून चार्ज करु नका. यामुळे डिव्हाइस ओव्हरहीट होऊ शकते आणि यामध्ये धमाका होऊ शकतो. फास्ट चार्जिंगसाठी फोन एका गार आणि अंधाऱ्या जागेवर ठेवा. गरज नसेल तर चार्जिंगच्या वेळी फोनचा वापर करु नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
'या' चुकांमुळे खराब होते शकते चार्जिंग स्पीड! अनेक तास चार्जिंगला लावुनही होत नाही चार्ज