TRENDING:

iPhone 15 च्या किंमतीत मोठी घसरण! डिस्काउंटसह मिळतोय फक्त 35 हजारात

Last Updated:
iPhone 15 Amazon वर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. यावर थेट 17 टक्के सूट देण्यात आलीये. जर सर्व ऑफर्सचा समावेश असेल तर या फोनची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.
advertisement
1/8
iPhone 15 च्या किंमतीत मोठी घसरण! डिस्काउंटसह मिळतोय फक्त 35 हजारात
नवी दिल्ली : प्रीमियम स्मार्टफोन्सचा विचार केला तर आयफोनकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. बरेच लोक आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहतात, परंतु त्याच्या किंमती जास्त असल्याने ते खरेदी करु शकत नाहीत.
advertisement
2/8
पण आता तुमच्यासाठी आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. सणासुदीचा सीझन संपला आहे, पण तरीही आयफोनवर मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. ही सूट खरेदीदारांसाठी एक आकर्षक ऑप्शन बनतेय. Amazon सध्या iPhone 15 वर मोठ्या प्रमाणात सूट देतेय.
advertisement
3/8
iPhone 15 चा 128GB व्हेरिएंट Amazon वर फक्त 79,600 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाला आहे. तसंच, त्यावर 17% फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध झाल्यानंतर, त्याची किंमत केवळ 65,900 रुपयांपर्यंत खाली येते.
advertisement
4/8
या फ्लॅट डिस्काउंटसह तुम्ही 13,700 रुपये वाचवू शकता. याव्यतिरिक्त, ICICI बँक आणि SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे या मॉडेलची प्रभावी किंमत 61,900 रुपये झाली आहे.
advertisement
5/8
थेट सवलतीसोबतच, Amazon एक्सचेंज ऑफर देखील देत आहे, ज्यामुळे ग्राहक आणखी बचत करू शकतात. जर तुम्ही 128GB व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीनुसार तुम्हाला 27,525 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते.
advertisement
6/8
Apple ने 2023 मध्ये लॉन्च केलेला iPhone 15 आकर्षक डिझाइनसह आला आहे. ज्यामध्ये ग्लास बॅक आणि ॲल्युमिनियम फ्रेम आहे. हे IP68 रेटिंगसह वॉटर रेसिस्टेंट आहे. यात 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे, जो HDR10, डॉल्बी व्हिजन आणि 2000 nits पीक ब्राइटनेससह येतो.
advertisement
7/8
iPhone 15 मध्ये Apple A16 Bionic चिपसेट आहे. ज्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मेंस प्रदान करण्याची क्षमता आहे. हे iOS 17 सह प्री-इंस्टॉल केलेले आहे. जे iOS 18.1 वर अपडेट केले जाऊ शकते. यात 6GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन आहे.
advertisement
8/8
फोटोग्राफी प्रेमींसाठी, iPhone 15 मध्ये 48MP रुंद आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर 12MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iPhone 15 च्या किंमतीत मोठी घसरण! डिस्काउंटसह मिळतोय फक्त 35 हजारात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल