TRENDING:

Internet Data लवकर संपतो ना? फोनमधील ही सेटिंग करा ऑन, दिवसभर पुरेल डेटा

Last Updated:
Smartphone Tips: अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर मिळतात. जे तुमचा फायदा करु शकतात. अशाच एका फीचरविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचा इंटरनेट डेटा सेव्ह होऊ शकतो.
advertisement
1/7
Internet Data लवकर संपतो ना? फोनमधील ही सेटिंग करा ऑन, दिवसभर पुरेल डेटा
स्मार्टफोन हा खूप लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. याच्या अनेक फीचर्ससाठी आपण इंटरनेटवर अवलंबून आहोत. तुम्हीही अँड्रॉइड स्मार्टफोन यूज करत असाल. तर यामध्ये तुमच्या कामाचं एक शानदार फीचर मिळतं. या फीचरच्या मदतीने तुम्ही डेटा लिमिट सेट करु शकता.
advertisement
2/7
म्हणजेच एका निश्चित वेळेनंतर तुम्ही किती डेटा यूज करु शकता. याची लिमिट सेट करण्याचा ऑप्शन मिळतो. या फीचरच्या मदतीने तुम्ही गरजेपेक्षा जास्त डेटा खर्च करणं टाळू शकता.
advertisement
3/7
खरंतर Instagram Reels आणि YouTube Short च्या काळात मोबाईल डेटा किती आणि किती वेळा खर्च होतो. याचा अंदाजच येत नाही. अशा वेळी हे फीचर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतं. जे तुमचा मोबाईल डेटा आणि यावर होणारा खर्च दोन्हीही वाचवेल.
advertisement
4/7
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये यूझर्सला Data Saver Mode मिळतो. याच्या मदतीने तुम्ही अॅप आणि अँड्रॉइड फोनचा डेटा यूज कमी करु शकता. फक्त एक टॉगल ऑन करुन तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनमधील हे भारी फीचर यूज करु शकता. चला पाहूया हे फिचर कसं ऑन करायचं.
advertisement
5/7
सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. येथे तुम्हाला SIM Card & Mobile Data चा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करावं लागेल. आता तुम्हाला Data Usage ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
advertisement
6/7
येथे यूझर्सला Data Saving ऑप्शन मिळेल. यावर तुम्हाला टॅप करावं लागेल. अखेरीस तुम्हाला डेटा सेव्हिंग टॉगल ऑन करावं लागेल.
advertisement
7/7
वरील स्टेप फॉलो करुन तुम्ही डेटा सेव्हिंग फीचर ऑन करु शकता. फिचरचे काहीच नुकसानही आहेत. हे ऑन होताच ऑटो-अपडेटिंग अॅप्स किंवा मोठी फाइल डाउनलोडिंग थांबेल. दोन्हीही फीचर्समध्ये खूप जास्त डेटा खर्च होतो. अशा प्रकारे तुम्ही डेटा सेव्हर मोड ऑफही करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलाॅजी/
Internet Data लवकर संपतो ना? फोनमधील ही सेटिंग करा ऑन, दिवसभर पुरेल डेटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल