श्रीलंकेने दिलेल्या 169 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण तांजीद तमीम शुन्यावर बाद झाला. तर त्याच्या जोडीला असलेल्या सैफ हसनने बांग्लादेशचा डाव सावरला.या दरम्यान हसनने 61 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या खेळीनंतर तौहीद हृदोयने श्रीलंकेचा डाव सावरला होता. हा डाव सावरताना त्याने अर्धशतकही ठोकलं होतं.या दरम्यान तौहीद ज्या लयीत खेळत होता ते पाहता तो बांग्लादेश सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण सामन्यात मोठा ट्विस्ट आला तौहीद 57 धावांवर बाद झाला.
advertisement
तौहीद ज्यावेळेस बाद झाला तेव्हा बांग्लादेशचा डाव 160 धावांपर्यंत पोहोचला होता.त्यामुळे बांग्लादेशला अवघ्या 10 धावा करायच्या होत्या. त्यावेळेस 19 व्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक धाव काढण्यात आली होती. त्यामुळे या ओव्हरमध्ये 5 धावा काढल्या होत्या. आता शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी 5 धावांची आवश्यकता होती.त्यावेळी ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर फोर गेला.त्यामुळे जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये 1 धाव हवी होती. यावेळी साधारण तीन बॉल डॉट गेले आणि पाचव्या बॉलवर सिंगल काढून बांग्लादेशने हा सामना जिंकला.
बांग्लादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे श्रीलंका प्रथम फलंदाजीस उतरली होती.यावेळी श्रीलंकेची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण पथूम निसांका हा अवघ्या 22 धावांवर बाद झाला होता. त्याच्यामागोमाग कुसल मेंडीस 34 धावांर बाद झाला.त्यानंतर विकेटची रागं लागली. त्यानंतर शनाका मैदानता उतरुन श्रीलंकेचा डाव सावरला. शनाकाने 64 धावांची अर्धशथकीय खेळी केली. या व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नाही. त्यामुळे अशाप्रकारे श्रीलंकने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 168 धावा केल्या होत्या.
पॉईंट्स टेबलमध्ये टॉप वर
बांग्लादेशने हा विजय मिळवून मोठा उलटफेर केला आहे.तसेच या विजयानंतर बांग्लादेशचे सुपर 4 मध्ये एका सामन्यात दोन गुण झाले आहेत. आता बांग्लादेशचा दुसरा सामना 24 सप्टेंबरला असणार आहे. शेवटचा सामना हा 25 सप्टेंबरला पाकिस्तान विरूद्ध खेळावा लागणार आहे. या दोन्ही संघापैकी एका सामन्यात जरी बांग्लादेश जिंकली तरी ती फायनल पोहोचण्यास पात्र ठरू शकणार आहे.