TRENDING:

WhatsApp चा हा निळा गोळा किती स्मार्ट? Meta AI चं फीचर कसं काम करतं समजून घ्या

Last Updated:
वेळोवेळी युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स आणत असतं. हे देखील युजर्सच्या फायद्याचं फीचर आहे.
advertisement
1/6
WhatsApp चा हा निळा गोळा किती स्मार्ट? Meta AI चं फीचर कसं काम करतं समजून घ्या
इंटरनेटच्या या जगात व्हॉट्सॲप हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. मित्र, कुटुंबीय, ऑफिसचे सहकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज बहुतेक लोक सर्वात आधी व्हॉट्सॲपचाच वापर करतात. वेळोवेळी युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स आणत असतं.
advertisement
2/6
मेसेज रिअॅक्शन, स्टेटस अपडेटपासून ते चॅट लॉकसारख्या सुविधा याचाच भाग आहेत. आता याच यादीत एक नवीन फीचर समाविष्ट झालं आहे, ज्याचं नाव आहे 'मेटा एआय' चॅटबॉट.
advertisement
3/6
अलीकडे तुम्ही व्हॉट्सॲपवर एक रंगीत गोळा पाहिला असेल. हा गोळा नेमका काय आहे? त्याचं काम काय? असे प्रश्न अनेकांना पडतात. खरं तर हा गोळा म्हणजेच ‘मेटा एआय’चं प्रतीक आहे. हे साधं फीचर नसून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉट आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही थेट व्हॉट्सॲपवरच माहिती शोधू शकता, प्रश्न विचारू शकता आणि संवादही साधू शकता.
advertisement
4/6
या फीचरमुळे इंटरनेटवर वेगवेगळ्या साइटवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे, ते तुम्ही व्हॉट्सॲपवरच मिळवू शकता. तो अनेक भाषा समजू शकतो आणि संवादही करू शकतो. त्यामुळे तुमचं दैनंदिन काम आणखी सोपं होतं.
advertisement
5/6
केवळ व्हॉट्सॲपच नाही, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही हे फीचर आणण्यात आलं आहे. त्यामुळे मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर याचा फायदा घेता येणार आहे.
advertisement
6/6
हे फीचर कसं वापरायचं?यासाठी तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. या गोळ्यावर क्लिक करा आणि चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाइप करा. त्यानंतर चॅटबॉट त्याचं उत्तर देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WhatsApp चा हा निळा गोळा किती स्मार्ट? Meta AI चं फीचर कसं काम करतं समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल