TRENDING:

मेंदू गोठवणारी थंडी अन् 'एव्हरेस्ट'वर आई-बाबांना वाहिली श्रद्धांजली,पोलीस दलाच्या 'शिखर वुमन' चे श्वास रोखून धरणारे PHOTOS

Last Updated:
द्वारका या ठाणे पोलीस दलात असून सध्या त्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रशासन पदावर कार्यरत आहेत.(अजित मांढरे, प्रतिनिधी)
advertisement
1/10
'एव्हरेस्ट'वर आई-बाबांना वाहिली श्रद्धांजली,पोलीस दलाच्या 'शिखर वुमन' चे PHOTOS
ती…एक महिला…ती एक आई, ती एक पत्नी आणि ती एक कर्तव्य दक्ष पोलीस पण ती इथपर्यंतच थांबली नाही. कारण, तिला आयुष्याचे शिखर एका वेगळ्या टोकावर नेवून ठेवायचं होतं. तीला तिच्या आई बाबांना अनोखी श्रद्धांजली वाहायची होती याकरता 'ती' बनली शिखर वुमन, त्यांचं नाव आहे द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे.
advertisement
2/10
सर्वोच्च शिखरावर एव्हरेस्टवर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायलेलं, हे पाहून प्रत्येक भारतीयांची महाराष्ट्र प्रेमींची छाती अभिमानाने भरुन आली. धक्कादायक म्हणजे, इथं एक तृतीयांश ॲाक्सिजन वातावरणात ॲाक्सिजन मास्क विना बोलणे म्हणजे मृत्याच्या दारात उभे राहण्यासारखं आहे. तरी हा भीम पराक्रम द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे यांनी करुन दाखवला.
advertisement
3/10
द्वारका या ठाणे पोलीस दलात असून सध्या त्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रशासन पदावर कार्यरत आहेत.
advertisement
4/10
जीवनात काही तरी नाही तर खूप काही करायचं हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी एक एक शिखर गाठायचे ठरवलं.
advertisement
5/10
त्यांनी आतापर्यंत एव्हरेस्ट शिखर, ल्होत्से शिखर आणि माऊंट लॅासेस ही शिखरे सर केली. मेंदू गोठवून टाकणा-या थंडीत त्यांनी ध्येय गाठलं.
advertisement
6/10
फक्त शिखर सर करणे एवढेच न करता. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गायले, तिरंगा फडकवला
advertisement
7/10
साईबाबांचा फोटो, लालबागच्या राजाचा फोटो, आणि ज्या पोलीस दलाचा त्यांना अभिमान आहे त्या महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज सर्वोच्च शिखरावर फडकवला.
advertisement
8/10
ज्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांना पोलीस दलात शिखर वुमन म्हटलं जातं.
advertisement
9/10
द्वारका भागीरथी विश्वनाथ डोखे यांनी जो पराक्रम केला. हे करायला खरंच धाडस लागतं कारण जीवघेणी थंडी, हिम वादळ अनंत अडचणी या सर्वांवर मात करायची असेल तर हवी जिद्द ती जिद्द द्वारका यांच्याकडे आहे.
advertisement
10/10
ते ही वयाच्या ५० व्या वर्षी त्या इथंच थांबणार नसून जगभरातील अनेक शिखरं त्यांना गाठायची आहेत. ते ती गाठणार यांत काहीच शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
मेंदू गोठवणारी थंडी अन् 'एव्हरेस्ट'वर आई-बाबांना वाहिली श्रद्धांजली,पोलीस दलाच्या 'शिखर वुमन' चे श्वास रोखून धरणारे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल