TRENDING:

Shoose Cleaning : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुवावे की नाही? नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी तुम्हाला माहित हव्याच!

Last Updated:
Shoes Cleaning Right Way : शूज हाताने धुवायला खूप वेळ आणि मेहनत लागते. हल्ली कोणाकडेच एवढा वेळ नसतो. त्यामुळे काही लोक वॉशिंग मशीनमध्ये शूज धुतात. पण वॉशिंग मशीनमध्ये शूज धुणं खरंच योय आहे का? यामुळे शुजचे काही नुकसान होऊ शकते का? चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.
advertisement
1/7
वॉशिंग मशीनमध्ये शूज धुवावे की नाही? नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी तुम्हाला माहित हव्याच!
हल्ली लोकांकडे केवळ एकच नाही तर अनेक शूज असतात. अशावेळी ते शूज स्वच्छ ठेवणं थोडं अवघड जाऊ शकतं. कारण प्रत्येक शूज हाताने धुवायला खूप वेळ लागतो. म्हणून काही लोक मशीनमध्ये शूज धुतात. पण प्रत्येक आपण मशीनमध्ये धुवू शकतो का? चला पाहूया.
advertisement
2/7
अनेक तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक शूज मशीनमध्ये धुण्यासाठी बनलेला नसतो. काही शूजसाठी तुमचे मशीन धोकादायक ठरू शकते आणि ते शुजचे नुकसान करू शकते. लेदर, साबर किंवा सिल्कपासून बनवलेले शूज मशीनमध्ये अजिबात धुवू नये. मशीनमध्ये फिरणारे पाणी आणि त्यामुळे होणाऱ्या घर्षणाने शूजचा रंग फिका पडू शकतो. मटेरियलदेखील खराब होऊ शकते.
advertisement
3/7
काही शूज तुम्ही मशीनमशीनमध्ये धुवू शकता. पण असे करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कॅनव्हास, स्पोर्ट्स किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेले बूट मशीनने धुण्यासाठी योग्य आहेत.
advertisement
4/7
शूज धुण्यासाठी मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्याच्या लेसेस काढा. शूजवर जास्त घाण, चिखल असल्यास तो आधी कोरड्या ब्रशच्या साहाय्याने काढून घ्या. शूजचा सोल कधीही मशीनमध्ये धुवू नका. कारण यामुळे त्याचा अकरा बिघडू शकतो. तो हाताने धुणंच योग्य आहे.
advertisement
5/7
हल्ली मशीनमध्ये शूज धुण्यासाठी पिशवी मिळते यामध्ये टाकून तुम्ही शूज धुतल्यास त्याचे नुकसान होत नाही. तुमच्याकडे या पिशव्या नसतील तर तुम्ही उशीचे कव्हरदेखील वापरू शकता.
advertisement
6/7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शूज धुताना हार्ड डिटर्जंट वापरणं टाळा. शूज धुण्यासाठी फक्त सौम्य द्रव डिटर्जंट वापरा. ​​पावडर डिटर्जंट शूजवर पांढरे डाग सोडू शकतात. तसेच मशीन डेलिकेत मोडवर चालवा आणि थंड पाणी वापरा. गरम पाण्यामुळे शूजचा सोल वेगळा होऊ शकतो.
advertisement
7/7
मशीनच्या ड्रायरमध्ये शूज टाकू नका. कारण यामुळे शूजचा आकार बिघडतो. शूज धुतल्यानंतर झटकळून त्यातील पाणी काढा आणि नंतर उन्हामध्ये ते सुकवा. हीच योग्य पद्धत आहे. या टिप्स फॉलो केल्यास तुमचे शूज व्यवस्थित धुतलेही जातील आणि तुम्हाला जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Shoose Cleaning : वॉशिंग मशीनमध्ये शूज धुवावे की नाही? नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी तुम्हाला माहित हव्याच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल