Shocking! एकीकडे समुद्रात जहाज बुडालं, दुसरीकडे आकाशातून विमान कोसळलं; 19 कोटी लोक अडचणीत, एअरपोर्ट बंद
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane Crash : फिलीपीन्समध्ये समुद्रात जाताच जहाज बुडाल्याची घटना घडली आहे तर दुसरीकडे एका ठिकाणी विमानाने आकाशात उड्डाण घेताच आकाशातून कोसळल्याची. दोन्ही घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
1/7

अमेरिकेत भीषण हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि दरम्यान मेन राज्यात एक मोठा अपघात झाला आहे. रविवारी संध्याकाळी बांगोर विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एक खाजगी जेट कोसळलं.
advertisement
2/7
हे विमान बॉम्बार्डियर चॅलेंजर 650 बिझनेस जेट होतं. विमानात तीन क्रू मेंबर्स आणि पाच प्रवाशांसह आठ जण होते.
advertisement
3/7
मीडिया रिपोर्टनुसार हा अपघात संध्याकाळी 7.45 च्या सुमारास घडला. उड्डाण घेण्याच्या काही मिनिटांपूर्वी, नियंत्रण कक्ष आणि पायलट यांच्यात झालेल्या संभाषणात दृश्यमानता कमी असल्याचं आणि बर्फ पडल्याचं नमूद करण्यात आलं.
advertisement
4/7
उड्डाणाची परवानगी मिळाल्यानंतर सुमारे दोन मिनिटांनी नियंत्रण कक्षातील व्यक्तीचा आवाज ऐकू आला, सर्व विमानांच्या हालचाली थांबवा आणि त्यानंतर काही क्षणात विमान उलटं झाल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
5/7
विमानतळावर तात्काळ आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. धावपट्टीवर फक्त आपत्कालीन वाहनांनाच परवानगी आहे. अपघातानंतर प्रवाशांची प्रकृती काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
6/7
अमेरिकेत मुसळधार बर्फवृष्टीमुळे 37 राज्यांमधील सुमारे 19 कोटी लोक प्रभावित झाले आहेत. 20 हून अधिक राज्यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.
advertisement
7/7
बर्फवृष्टीमुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत. वादळामुळे हजारो घरांमध्ये लाइट नाही. वादळामुळे प्रवासावरही गंभीर परिणाम झाला आहे. आठवड्याच्या शेवटी अमेरिकेतील 14000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
Shocking! एकीकडे समुद्रात जहाज बुडालं, दुसरीकडे आकाशातून विमान कोसळलं; 19 कोटी लोक अडचणीत, एअरपोर्ट बंद