TRENDING:

US Election Result 2024: एका खारुताईनं केला कमला हॅरिसचा घात, 24 तासात पलटणार निवडणूक

Last Updated:
पीनटची रेबीज टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगून अधिकाऱ्यांनी तिला उचलून नेलं आणि अधिकाऱ्यांना इच्छा मरण दिलं असं सांगून तिला मारलं.
advertisement
1/7
एका खारुताईनं केला कमला हॅरिसचा घात, 24 तासात पलटणार निवडणूक
न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी 24 तास असं काही घडलं की ज्याचा परिणाम या निवडणुकीवरही पाहायला मिळत आहे. एका खारुताईनं कमला हॅरिसचा घात केला अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. एका खारुताईला मारल्यानंतर तो विषय चक्क राजकीय झाला आणि त्यावरुन न्यूयॉर्कच्या निवडणुकीचं वारंच बदललं.
advertisement
2/7
न्यूयॉर्कमध्ये एक खारुताईमुळे कमला हॅरिस यांचा घात झाल्याची चर्चा सोशल माीडियावर रंगली आहे. त्याचं झालं असं की या खारुताईला जबरदस्तीनं पकडून तिचा जीव घेण्यात आला.
advertisement
3/7
न्यूयॉर्कमधील अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की त्या खारुताईची रेबीज टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तिच्यापासून धोका होता, संसर्ग पसरण्याची भीती होती. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
advertisement
4/7
पीनट नावाची खारुताई सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. या खारुताईला रेबीज झाल्याचं सांगून तिला पकडून तिला मारण्यात आलं. ज्याने या खारुताईला पाळलं त्याने सोशल मीडियावरुन तिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.
advertisement
5/7
अमेरिकेत निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये खारुताई हा महत्त्वाचा मुद्दा झाला. सोशल मीडियावरही खारुताईसाठी न्याय मिळवून द्यावा अशी मोहीम सुरू केली. खारुताईला मारणाऱ्यांविरोधात ही मोहीम राबवण्यात आली.
advertisement
6/7
हा मुद्दा संवेदनशील बनला आणि हाच मुद्दा प्रचाराचाही बनला. डोनाल्ड ट्रम्प ते एलन मस्क यांनी हा मुद्दा उचलून धरला. याचा फटका कमला हॅरिस यांना होणार आहे. त्यामुळे खारुताईचा मुद्दा निवडणुकीचं गणित बिघडवू शकतो.
advertisement
7/7
या खारुताईचं नाव पीनट आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. ती खूप प्रसिद्ध होती. तिच्या व्हिडीओला देखील हजारो, लाखो व्ह्यूज मिळत होते. पीनटची रेबीज टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगून अधिकाऱ्यांनी तिला उचलून नेलं आणि अधिकाऱ्यांना इच्छा मरण दिलं असं सांगून तिला मारलं. हा मुद्दा तापला आणि त्यानंतर त्यावरुन राजकारण सुरू झालं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
US Election Result 2024: एका खारुताईनं केला कमला हॅरिसचा घात, 24 तासात पलटणार निवडणूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल