शेवटी नाळ मातीशीच जोडलेली असते, स्पेनमध्ये झालं बाप्पाचं आगमन
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
स्पेनमध्ये धुमधडाक्यात पार पडला गणेशोत्सव, चांद्रयानच्या देखाव्यात झाली गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना.
advertisement
1/5

स्पेनमध्ये गणेशोत्सव? हे ऐकूनच खूप भारी वाटतंय ना. खरंतर तिथे हा उत्सव साजरा करणारं मंडळच फार कमाल आहे. या मंडळाची सदस्य संख्या आहे 120. तर, गणेशोत्सवात 200 ते 250 भाविक सहभागी झाले होते.
advertisement
2/5
बार्सिलोनामध्ये गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात पार पडला. मंडळातील सदस्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी मराठी गाण्यांवर नृत्य सादर करून यावेळी आनंद साजरा केला.
advertisement
3/5
दोन महिन्यांपूर्वी स्थापित झालेल्या 'महाराष्ट्र मंडळ स्पेन ग्रुप'चे सदस्य परदेशात राहूनही आपल्या देशाची, आपल्या मायभूमीची परंपरा, संस्कृती जपण्याचा मनापासून प्रयत्न करतात.
advertisement
4/5
सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन मराठी संस्कृतीचं जतन करावं, मराठी मूल्य आपल्या कुटुंबियांमध्ये रुजवावीत हेच या मंडळाचं उद्दिष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी चांद्रयानच्या देखाव्यात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली होती.
advertisement
5/5
या मंडळाचं अध्यक्षपद आहे ऋषिकेश लाचुरे यांच्याकडे. तर, गौतम रॉय, देवेंद्र, तुषार फेणीकर, सुमीत कुटवाल, नितीन जोशी, शंभूराज, सौ. वैशाली मावळणकर, सौ. सोनाली लाचुरे, स्वरुप वैद्य , ऋतुजा दिघे, मेघा, प्रांजली वनीकर, इत्यादी सदस्यांचा या मंडळात समावेश आहे.