Air Hostess : एअर हॉस्टेस ड्रेसखाली लपवतात एक सीक्रेट गोष्ट, फ्लाइट अटेंडेंटने स्वत:च उघड केलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air Hostess Dress : एअर हॉस्टेसचा ड्रेस अनेकांना आकर्षक वाटतो. पण त्यांच्या ड्रेसमागे अनेक रहस्ये लपलेली असतात. एका फ्लाइट अटेंडंटने तिच्या युनिफॉर्मबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्या बहुतेक लोकांना माहित नसतील.
advertisement
1/5

प्रवास म्हटलं की आपण आरामदायी कपडे घालूनच करतो. पण तुम्ही विमानाने प्रवास करताना पाहिलं असेल आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या एअर हॉस्टेस जे युनिफॉर्म घालतात, त्यांचे कपडे टाइट असतात.
advertisement
2/5
प्रत्येक एअरलाइन्सच्या अटेंडंटचा स्वतःचा वेगळा युनिफॉर्म असतो. त्याची रचना त्यांच्या कंपनीचं प्रतिनिधित्व करते. अलीकडेच चेशायरमध्ये राहणाऱ्या फ्लाइट अटेंडंट डॅनियलने तिच्या कंपनी एमिरेट्सच्या युनिफॉर्मचे काही रहस्य उघड केले.
advertisement
3/5
डॅनियलने सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर @danudboyy या नावाने एक अकाउंट तयार केलं आणि अनेक खुलासे केले. डॅनियल म्हणाली, बहुतेक लोक जे फ्लाइट अटेंडंट बनू इच्छितात ते त्यांच्या युनिफॉर्मने प्रभावित होतात. तिने सांगितलं की एमिरेट्सच्या युनिफॉर्मबाबत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहित नसतील.
advertisement
4/5
एमिरेट्स एअरलाइन्सच्या युनिफॉर्मचा रंग बेज आहे. हा वाळवंटातील वाळू दर्शवतो. याशिवाय त्यांचा ड्रेस वॉटरप्रूफ आहे. हे दाखवण्यासाठी तिने तिच्या कपड्यांवर पाणीही टाकलं. फ्लाइट अटेंडंट घालतात त्या स्कार्फमधील 7 प्लीट्स यूएईच्या 7 अमिरातींचे प्रतिनिधित्व करतात.
advertisement
5/5
डॅनियलने सांगितलं की क्रू मेंबर्स त्यांच्या ड्रेसखाली आरामदायी पायजमा घालतात. लांब प्रवासादरम्यान ते विमानातच त्यांचा युनिफॉर्म काढू शकतात आणि पायजमामध्ये आरामात झोपू शकतात. हा पायजमा एअरलाइन्सकडून देखील दिला जातो. क्रूच्या मागे असं लिहिलेलं असतं की जरी एखाद्या प्रवाशाने त्यांना पायजमामध्ये पाहिलं तरी ते कर्मचारी आहेत हे समजून जावं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Air Hostess : एअर हॉस्टेस ड्रेसखाली लपवतात एक सीक्रेट गोष्ट, फ्लाइट अटेंडेंटने स्वत:च उघड केलं