9 देशांमधून वाहते ही नदी, पण एकही देश यावर पूल बांधू शकला नाही, का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
अगदी छोट्या छोट्या नद्यांवरही पूल असतात. मग 9 देशांमधून वाहणारी इतकी मोठी नदी. पण तरी या नदीवर एकही पूल नाही. कोणत्याच देशाने या नदीवर पूल बांधला नाही. यामागे काही कारणं आहेत.
advertisement
1/9

तुम्ही पाहिलं असेल बहुतेक नद्यांवर पूल असतात. ज्यावरून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर सहज जाता येतं. पण एक अशी नदी जी जगातील सगळ्यात मोठी नदी आहे, तरी या नदीवर पूल नाही.
advertisement
2/9
ही नदी इतकी मोठी आहे की तिची लांबी 6 हजार किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. बहुतेक ठिकाणी याची रूंदी 11 किलोमीटरपेक्षागी जास्त आहे. काही ठिकाणी समुद्रापेक्षाही ती रूंद दिसते. एका किनाऱ्याहून दुसरा किनारा दिसतच नाही.
advertisement
3/9
इतकी मोठी नदी तब्बल 9 देशांमधून वाहते. पण एका देशाने या नदीवर पूल बांधला नाही. यामागे असं काय कारण आहे, असा प्रश्न पडतोच.
advertisement
4/9
ही नदी आहे अमेझॉन नदी. पेरूतील एंडीज पर्वतमालेतून ती निघते आणि अटलांटिक महासागराला मिळते.
advertisement
5/9
ही नदी दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांमधून जाते. यात ब्राझील, बोलिविया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, वेनेझुएला, गयाना, फ्रेंच गयाना और सूरीनाम या देशांचा समावेश आहे. दक्षिण अमेरिकेचा 40 टक्के भाग या नदीने घेरलेला आहे.
advertisement
6/9
इतक्या देशांमधून ही नदी जाते पण कुणीच यावर ब्रीज बांधू शकला नाही. यामागील कारण म्हणजे नदीची लांबी, नदीकिनाऱ्यावरील माती, घनदाट जंगल, पूरक्षेत्र भाग, तसंच नदी वारंवार आपला मार्ग बदलते.
advertisement
7/9
ही आव्हानं स्वीकारूनही पूल बनवला तरी त्याचा खर्च खूप आहे पण इतका खर्च करूनही या पुलाची इतकी गरज नाही. मग हा खर्च वायाच आहे.
advertisement
8/9
स्वीस फेडरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्ट्रक्चरल इंजीनिअरिंचे चेअरपर्सन वॉल्टर कॉफमन यांनी लाइव्ह सायन्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की या नदीवर पूल नाही कारण त्याची गरजच नाही. नदी अशा ठिकाणाहून वाहते जिथं पुलाची गरजच नाही. जिथं लोकसंख्या जास्त नाही.
advertisement
9/9
जी ठिकाणं या नदीजवळ आहेत ती इतकी विकसित आहेत की एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी फेरीची सोय चांगली आहे, लोकांना पुलाची गरज वाटत नाही. त्यामुळे पूल बांधला नाही.