फक्त 2 मुलांना सांभाळा, पगार 83 लाख, जगभर फिरायलाही मिळणार; ड्रिम जॉबचे डिटेल्स पटापट पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
एका बिझनेसमनने आपल्या मुलांसाठी नॅनीची जाहिरात दिली आहे.
advertisement
1/6

भरपूर पगार, सुट्ट्या आणि इतर सुविधा अशी नोकरी मिळाली तर... अशाच एका नोकरीची जाहिरात निघाली आहे. जी सर्वत्र चर्चेत आली आहे. फक्त 2 मुलं सांभाळण्यासाठी तब्बल 80 लाख रुपये पगार मिळतो आहे. नॅनीची ही नोकरी.
advertisement
2/6
ही नोकरी देणारी व्यक्तीही काही साधीसुधी नाही. तर बिझनेसमॅन विवेक रामस्वामी. अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील संभाव्य उमेदवार असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या विवेक रामस्वामी यांनी अमेरिकास्थित EstateJobs.com या एजन्सीच्या माध्यमातून नॅनीसाठीची एक जाहिरात दिली आहे.
advertisement
3/6
आता नॅनी म्हटलं तिथंच तुम्हाला नोकरीचं स्वरुप लक्षात आलं असेल. जिथं लहान मुलांचा सांभाळ करणं अपेक्षित आहे. या कामासाठी साधारण किती पगार दिला जाऊ शकतो? अंदाजे 20 ते 30 हजार रुपये. पण, रामस्वामी त्यांच्या इथं रुजू होणाऱ्या नॅनीला 83 लाख रुपये पगार आहे.
advertisement
4/6
नोकरीसाठीच्या या जाहिरातीतून इच्छुकांना एका उच्चभ्रू कुटुंबासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे.
advertisement
5/6
विवेक आणि त्यांची पत्नी अपूर्वा यांच्या दोन मुलांना सांभाळायचं आहे. नोकरीवर रुजू होणाऱ्या नॅनीला रामस्वामी कुटुंबासमवेत जगभरात फिरण्याची संधी मिळणार आहे. दर आठवड्याला या कुटुंबासोबत खासगी विमानानं विविध ठिकाणी फिरावं लागेल.
advertisement
6/6
नॅनी ही शेफ, हाऊसकिपर, सिक्युरिटी या टिमचा भाग असेल. या टिमसोबत मिळूनच तिला मुलांशी संबंधित काम करायची आहेत. ही नोकरी करणाऱ्या आठवड्यातून एक दिवस सुट्टी असेल. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 21 वर्षे असावं. (सर्व फोटो - इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
फक्त 2 मुलांना सांभाळा, पगार 83 लाख, जगभर फिरायलाही मिळणार; ड्रिम जॉबचे डिटेल्स पटापट पाहा