Calculator : कॅलक्युलेटर AC आणि CE बटण कशासाठी असतं, याचं काम काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Calculator AC CE Button : कॅलक्युलेटरमध्ये बरीच बटणं असतात. त्यापैकी काही मोजक्याच बटणांचा आपण वापर करतो. पण इतर काही बटणं खूप कामाची आहेत, त्यांचा वापर कित्येकांना माहितीच नाही. त्यापैकी दोन बटणं म्हणजे AC आणि CE.
advertisement
1/5

ऑफिस असो, दुकान असो वा घर झटपट हिशेब करण्यासाठी कित्येक लोक कॅलक्युलेटर वापरतात. सामान्यपणे कॅलक्युलेटरमध्ये नंबर, वजा, अधिक, गुणाकार अशी चिन्हं याच बटणांचा वापर जास्त होतो.
advertisement
2/5
पण याशिवाय कॅलक्युलेटरमध्ये इतरही बरीच बटणं असतात, त्यापैकी एक म्हणजे AC आणि CE बटण. ज्याचा अर्थ काय, ते कशासाठी असतं, कशासाठी वापरतात, हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
3/5
कॅलक्युलेटरमध्ये AC बटणाचा फुलफॉर्म आहे, AII Clear. ऑल क्लिअर या बटणाचा वापर तेव्हा होतो जेव्हा आपण कॅलक्युलेटरमध्ये जो काही हिशोब केला आहे तो पूर्णपणे क्लिअर करायचा असेल म्हणजे घालवायचा असेल.
advertisement
4/5
कॅलक्युलेटरमध्ये AC बटण दाबताच तुम्ही त्यात जे काही नंबर्स, चिन्हं टाकले आहेत, जी काही प्रक्रिया केली आहे ते सगळं जातं आणि कॅलक्युलेटरमध्ये पुन्हा 0 येतं. यानंतर तुम्ही नवीन कॅलक्युलेशन सुरू करू शकता.
advertisement
5/5
दुसरं बटण म्हणजे CE ज्याचा फुलफॉर्म आहे Clear Entry. क्लिअर एंट्री बटणाचा वापर तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला शेवटचा नंबर हटवायचा असतो. जसं की तुम्ही एखादा नंबर चुकून टाकला तर संपूर्ण कॅलक्युलेशन क्लिअर करण्यासाठी CE बटण दाबला की फक्त तो नंबर डिलीट होईल, पूर्ण कॅलक्युलेशन घालवण्याची गरज नाही.