Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय पुरुषांचं कटू सत्य, प्रत्येक महिलेला माहितीच हवं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : चाणक्यनीती आजही प्रासंगिक आहे. आचार्य चाणक्य यांचे शब्द आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्य यांनी पुरुष आणि स्त्री यांच्यातील संबंधांबद्दल अनेक गहन गोष्टी देखील सांगितल्या.
advertisement
1/5

पुरूषांनी समाजात स्वतःला खूप पूर्वीपासून श्रेष्ठ मानलं आहे. जेव्हा एखादी स्त्री त्याला मागे टाकते किंवा पराभूत करते तेव्हा त्याचा अहंकार चिरडला जातो. हा अहंकार वाचवण्यासाठी तो स्त्रीवर खोटे आरोप करून तिला अपमानित करण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की जेव्हा एखादी व्यक्ती आपली शक्ती, तर्क किंवा सामाजिक वर्चस्व गमावते तेव्हा ती आक्रमक होते. महिलांच्या संदर्भात ही आक्रमकता अनेकदा त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या स्वरूपात येते.
advertisement
3/5
आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखादा पुरूष एखाद्या स्त्रीविरुद्ध हरायला लागतो तेव्हा तो पहिला हल्ला त्या स्त्रीच्या चारित्र्यावर करतो. सामाजिक विचारसरणी अजूनही पुरुषप्रधान आहे. स्त्रीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा सर्वात सोपा मार्ग आहे, कारण समाज त्यावर लवकर विश्वास ठेवतो.
advertisement
4/5
आपला पराभव स्वीकारण्याऐवजी, अयशस्वी पुरुष स्त्रीची प्रतिमा खराब करून आपला कमकुवतपणा लपवण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
5/5
जरी हे शतकानुशतकं आधी सांगितलं गेलं असलं तरी ते आजही खरं आहे. कामाच्या ठिकाणी, राजकारणात, खेळात किंवा अगदी कुटुंबातही, जेव्हा महिला पुरुषांपेक्षा पुढे जातात तेव्हा अनेकदा त्यांच्यावर बोटं उचलली जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय पुरुषांचं कटू सत्य, प्रत्येक महिलेला माहितीच हवं