TRENDING:

Chanakya Niti : चाणक्य यांनी या पुरुषांना दिलाय महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला

Last Updated:
Chanakya Niti in Marathi : पुरुष म्हणजे ते कधी ना कधी महिलांकडे आकर्षित होतात. पण काही पुरुषांसाठी महिला विषासारख्या असतात, असं चाणक्य म्हणाले. या पुरुषांना त्यांनी महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
1/7
Chanakya Niti : चाणक्य यांनी या पुरुषांना दिलाय महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला
आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य म्हणूनही ओळखलं जातं. ते राजा चंद्रगुप्त मौर्यचे महामंत्री होते. आचार्य चाणक्य यांना प्रत्येक विषयाची माहिती होती. त्यांनी अर्थकारण, राजकारणच नव्हे तर अगदी खासगी आयुष्याबाबतही बरेच मोलाचे सल्ले दिले आहेत. ज्यांचा उल्लेख चाणक्यनीतीत आहे.
advertisement
2/7
आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीत महिला-पुरुष, पती-पत्नी यांच्याबाबतही बरंच काही सांगण्यात आलं आहे. पुरुषांनी काय करायला हवं आणि काय नाही, हे त्यांनी सांगितलं. त्यापैकीच हा एक सल्ला जो चाणक्य यांनी पुरुषांना दिला आहे.
advertisement
3/7
कित्येक पुरुषांना महिलांचा नाद असतो. महिलांशिवाय त्यांचं आयुष्यच नसतं. पण मध्ये काही पुरुषांना महिलांपासून दूरच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण अशा पुरुषांसाठी महिला विष ठरू शकतात, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
advertisement
4/7
निर्धन पुरुष - गरीब, पैसा नसलेल्या पुरुषांनी महिलेला मिळवण्याची इच्छा कधीच ठेवून नये. कारण ते महिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. शेवटी अशा महिला पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसह शारीरिक संबंध ठेवतात. त्यामुळे या पुरुषांना आयुष्यभर दुःख आणि अपमान सहन करावा लागतो.
advertisement
5/7
वृद्ध - वृद्ध पुरुषांसाठी तरुण महिला विषासारखी असते. धनाच्या जोरावर जरी अशी महिला मिळाली तरी ते पुरुष त्यांना शारीरिक सुख देऊ शकत नाहीत. अशा महिला पतीच्या जवळच्या व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवते.
advertisement
6/7
नपुंसक - असे पुरुष आपल्या पत्नीला संतुष्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांचं आणि त्या महिलेचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. अशा पुरुषांसाठी महिला विषासमान ठरतात.
advertisement
7/7
बुद्धिमान - बुद्धिमान पुरुषांना क्रूर आण दुष्ट स्वभावाच्या महिलेवर कधीच प्रेम करू नये. नाहीतर ती त्याच्या बुद्धीवर ग्रहण लावते. अशी महिला त्या पुरुषाची ऊर्जा आणि धन नष्ट करणारी असते. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Chanakya Niti : चाणक्य यांनी या पुरुषांना दिलाय महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल