Tadoba Tiger : प्राण्यांच्या जंगलात माणसांची गर्दी; ताडोबात वाघाला घेरलं पर्यटकांनी
- Published by:Priya Lad
Last Updated:
बुद्ध पौर्णिमेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या गणनेनंतर 25 मे रोजी तिथलं धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. वाघांसाठी संरक्षित केलेल्या या क्षेत्रात पर्यटकांनी वाघाला वेढा घातला.
advertisement
1/5

भारतातील वाघांची घटती संख्या, वाघांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्याची जाणीव झाल्यानंतर देशात व्याघ्र संरक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. वाघांची शिकार, वाघांच्या कातडीच्या विक्रीवरही बंदी आली. त्यानंतर वाघांच्या संवर्धनाचा विचार होऊन व्याघ्र प्रकल्पाचा विशेष दर्जा निर्माण झाला. (फाईल फोटो)
advertisement
2/5
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील दुसरा व्याघ्र प्रकल्प आहे. संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन 23 फेब्रुवारी 1995 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. (फाईल फोटो)
advertisement
3/5
22 मे, 2024 रोजी बुद्ध पौर्मिणेच्या रात्री चंद्राच्या लख्खं प्रकाशात ताडोबा प्रकल्पातील वाघांची गणना झाली. कोअर झोनमध्ये 29 आणि बफर झोनमध्ये 26 असे एकूण 55 वाघ आढळून आले आहेत. (फाईल फोटो)
advertisement
4/5
पण इथं पर्यटकांची संख्या इतकी वाढली आहे की वाघांसाठी संरक्षित केलेल्या या क्षेत्रात माणसांनीच घुसखोरी केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (25 मे 2024) कोअर झोनमध्ये जिप्सीतून पर्यटकांनी गर्दी केली. गाड्यांनी चारही बाजूनं वाघाला घेरलं. (फाईल फोटो)
advertisement
5/5
मोहर्ली ते खटोडा रस्त्यावरील हे दृश्य आहे. वाघाला कोणत्याच दिशेनं बाहेर पडता येईना. सुदैवाने वाघ संतप्त झाला नाही नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. माहितीनुसार इथं जिप्सींना एकाच रांगेत चालण्याची परवानगी आहे. असं असताना जिप्सीनं दोन्ही बाजूनं रस्ता अडवला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Tadoba Tiger : प्राण्यांच्या जंगलात माणसांची गर्दी; ताडोबात वाघाला घेरलं पर्यटकांनी