TRENDING:

पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे जिथे झुरळ नाहीत? अगदी कुठेही आढळणारे कॉकरोच स्वत:ला जिवंत ठेवण्यात कुठे ठरले फेल

Last Updated:
पृथ्वीवर असं ठिकाण आहे का जिथे कॉक्रोच किंवा झुरळ नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हा एक मोठा प्रश्न आहे की, पृथ्वीवर अशी एखादी जागा शिल्लक आहे का, जिथे कॉकरोच (झुरळे) आढळत नाहीत?
advertisement
1/11
पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे जिथे झुरळ नाहीत? कुठेही आढळणारे कॉकरोच कुठे ठरले फेल
कधीकधी लोकांच्या मनात असे काही प्रश्न येतात, ज्याचा अर्थ किंवा लॉजिक नसतं. पण तरी देखील लोक जगातील विचित्र गोष्टींबद्दल किंवा शक्यतांबद्दल विचार करत असतात. असं झालं तर काय होईस, तसं झालं तर काय होईल? असे प्रश्न अनेकांच्या डोक्यात चालत असतात. असाच एक विचित्र पण कामाचा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
2/11
पृथ्वीवर असं ठिकाण आहे का जिथे कॉक्रोच किंवा झुरळ नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हा एक मोठा प्रश्न आहे की, पृथ्वीवर अशी एखादी जागा शिल्लक आहे का, जिथे कॉकरोच (झुरळे) आढळत नाहीत? अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीवर टिकून असलेल्या कॉकरोचबद्दल असे मानले जाते की, कोणत्याही परिस्थितीत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःला जिवंत ठेवण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता आहे.या जीवांना पृथ्वीखाली 3-4 किलोमीटर खोलवरही आढळले आहे, जिथे ते आरामात राहत होते. मग, हे शक्य आहे का की पृथ्वीवर काही जागा अशा आहेत जिथे ते आढळत नाहीत? होय, असे काही ठिकाणे आहेत. पण त्या आधी झुरळ कोणत्या परिस्थितीत जिवंत रहातात हे पाहू.
advertisement
3/11
खोल खाणीत आढळले झुरळभारतातील बंद झालेल्या कोलार गोल्ड फिल्ड खाणीत 2.5 किलोमीटर खाली हजारो कॉकरोच सापडले होते. तर 1980-90 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील 1050 मीटर खोल असलेल्या ताऊ टोना सोन्याच्या खाणीत कॉकरोच पिलांना जन्म देताना आढळले.दक्षिण आफ्रिकेतील 4 किमी खोलीच्या मोनेंग सोन्याच्या खाणीत, जिथे तापमान 55–60°C पर्यंत असते, तिथेही ते आढळले. सामान्यतः ते माणसांसोबत पोहोचतात, परंतु एकदा पोहोचल्यावर तिथे कायमचा तळ ठोकतात.
advertisement
4/11
अंतराळात2007 मध्ये रशियाने आपल्या कॅप्सूलमधून नर-मादी कॉकरोचना 33 दिवसांसाठी अंतराळात पाठवले. त्यांनी मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये गर्भधारणा केली आणि पृथ्वीवर परतल्यानंतर मादीने 33 निरोगी पिलांना जन्म दिला.2014 मध्ये Foton-M4 यानातून पुन्हा कॉकरोचना अंतराळात पाठवले असता, शास्त्रज्ञांनी पाहिले की गुरुत्वाकर्षण नसताना त्यांची पिले गोल जन्माला येतात, तर पृथ्वीवर ते सपाट असतात.
advertisement
5/11
अणुबॉम्ब हल्लाहिरोशिमा आणि नागासाकी येथील अणुबॉम्ब स्फोटानंतरही, त्याच्या ढिगाऱ्यांमध्ये कॉकरोच जिवंत फिरताना आढळले.ते अंतराळातील रेडिएशन सहज सहन करू शकतात, खूप कमी ऑक्सिजनमध्ये जगू शकतात आणि आठवडे न खाता-पिता राहू शकतात. या कारणांमुळे झुरळ वेगवेगळ्या परिस्थीतीत जिवंत राहिले.
advertisement
6/11
ही आहेत पृथ्वीवरील 'नो कॉकरोच झोन'तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर काही जागा अशा आहेत जिथे एकही कॉकरोच आढळत नाही. कॉकरोच नसलेली ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
7/11
1. अंटार्क्टिका (Antarctica)संपूर्ण अंटार्क्टिका खंडात एकही कॉकरोच नाही.येथील तापमान -50°C ते -89°C पर्यंत असते, ज्यामुळे कॉकरोचचे जगणे अशक्य होते.येथील संशोधन केंद्रांमध्ये कठोर बायोसिक्युरिटी नियम लागू आहेत. प्रत्येक वस्तूची तपासणी केली जाते, जेणेकरून कोणताही कीटक किंवा कॉकरोच आत येऊ नये.2015 मध्ये एकदा न्यूझीलंडच्या एका स्टेशनवर एक जर्मन कॉकरोच सापडला होता, त्याला त्वरित मारण्यात आले होते.
advertisement
8/11
2. सायबेरियातील काही अति-थंड भाग (Siberia)सायबेरियातील ओयम्याकोन आणि वर्कहोयांस्क सारख्या प्रदेशात हिवाळ्यात तापमान -60°C ते -70°C पर्यंत खाली जाते. या भागात कॉकरोच आढळत नाहीत.
advertisement
9/11
3. हिमालयातील खूप उंच शिखरेहिमालयात 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर ऑक्सिजन खूप कमी होतो आणि तापमान नेहमी मायनसमध्ये (शून्याच्या खाली) असते. त्यामुळे कॉकरोचसाठी तेथे राहणे अत्यंत अशक्य आहे. 5300 मीटरवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतही कॉकरोच आढळत नाही.
advertisement
10/11
4. दूरचे पॅसिफिक महासागरीय बेटेपॅसिफिक महासागरातील पाल्मीरा एटॉल, जार्विस बेट, हाउलँड बेट अशा दूरच्या बेटांवर मानवाचा वावर खूप कमी आहे. त्यामुळे कॉकरोच अजूनही या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत. यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस या बेटांवर कीटकांना रोखण्यासाठी खूप कठोर नियम पाळते.
advertisement
11/11
5. ग्रीनलँडचा आतील बर्फाळ भाग (Greenland)बाहेरील तापमान आणि बर्फाच्या जाड थरांमुळे कॉकरोच ग्रीनलँडच्या आतील भागात पोहोचू शकलेले नाहीत. किनारी शहरांमधील काही घरांमध्ये ते क्वचित मिळू शकतात, परंतु आतील 99% भागात ते अजिबात आढळत नाहीत. काही आर्कटिक बेटांवर जिथे 10 महिने बर्फ जमा असतो, तिथेही कॉकरोच पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे जिथे झुरळ नाहीत? अगदी कुठेही आढळणारे कॉकरोच स्वत:ला जिवंत ठेवण्यात कुठे ठरले फेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल