TRENDING:

जे लिहिलं तेच घडलं! सोशल मीडिया पोस्ट केली आणि इन्फ्लूएन्सरला मृत्यूने गाठलं

Last Updated:
Biker Accident News : कधीकधी लोक नकळत अशा गोष्टी बोलतात ज्या विनोद किंवा सामान्य वाटू शकतात, पण त्याच गोष्टी कटू सत्यात बदलतात. असंच एक धक्कादायक प्रकरण.
advertisement
1/7
जे लिहिलं तेच घडलं! सोशल मीडिया पोस्ट केली आणि इन्फ्लूएन्सरला मृत्यूने गाठलं
कोलंबियातील 25 वर्षांची तरुणी, करेन सोफिया किरोस रॅमिरेझ असं या तरुणीचं नाव. जिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि तिच्यासोबत तसंच घडलं. तिने मृत्यूची भीती व्यक्त केली आणि तिला मृत्यूने गाठलं.  पोस्ट केल्याच्या अवघ्या काही तासानंतर तिचं आयुष्य कायमचं संपलं. 
advertisement
2/7
सोफिया जी सोशल मीडियावर 'बाईकर गर्ल' म्हणून ओळखली जाते. ती त्यादिवशी चष्माशिवाय बाईक चालवत होती. अपघाताच्या काही तास आधी तिने एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, "आशा आहे की मी आज अपघात करणार नाही. कारण मी चष्म्याशिवाय गाडी चालवत आहे."
advertisement
3/7
तिने मजेमजेत लिहिलेलं हे कॅप्शन काही तासांनंतर खरी ठरेल याची तिने कल्पनाही केली नव्हती.  काही तासांनंतरच तेच घडलं, ती दोन गाड्यांमधून जात असताना एक भयानक अपघात झाला.
advertisement
4/7
रिपोर्टनुसार ती तिच्या बाईकवरून 2 गाड्यांमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा तिचं नियंत्रण सुटलं आणि तिची बाईक आधी एका बाजूने जाणाऱ्या कारवर आदळली आणि नंतर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.
advertisement
5/7
अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक तपासात असं दिसून येतं की सोफियाच्या मृत्यूचं कारण तिने 2 गाड्यांमधून जाण्याचा प्रयत्न होता. पण हा फक्त एक प्राथमिक अंदाज आहे.
advertisement
6/7
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचा जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांवरून पोलीस आणि तपास संस्था आता अपघातासाठी इतर चालक जबाबदार होते का हे ठरवतील. सध्या तपास सुरू आहे.
advertisement
7/7
ती फक्त एक बाईक रायडर नव्हती तर ती सोशल मीडियावर फेमस होती. तिचे इन्स्टाग्रामवर 45000 हून अधिक फॉलोअर्स होते. तिने तिच्या सुझुकी गिक्सर बाईक राईड्सचे व्हिडिओ शेअर केले. तिला टॅटूचीही आवड होती आणि ती तिचं आर्ट पोस्ट करायची. (सर्व फोटो : न्यूयॉर्क पोस्ट)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
जे लिहिलं तेच घडलं! सोशल मीडिया पोस्ट केली आणि इन्फ्लूएन्सरला मृत्यूने गाठलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल