Plane Facts : विमानात बिलकुल बोलू नका हे शब्द, चुकूनही बोललात तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Airplane Facts : विमानतळ आणि विमानांमधील सुरक्षेबाबत खूप कडक नियम बनवण्यात आले आहेत. काही शब्द वापरल्यानेही तुम्ही अडचणीत येऊ शकता.
advertisement
1/5

आजच्या काळात विमान प्रवास हा सर्वात जलद आणि सोयीस्कर प्रवास मार्गापैकी एक आहे, पण त्यासोबत काही खबरदारी देखील आवश्यक आहे. काही शब्द वापरल्यानेही तुम्ही अडचणीत येऊ शकता.
advertisement
2/5
असं अनेकदा घडते की लोकांनी विनोदाने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असे शब्द वापरले आहेत ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. अलीकडेच अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथं विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांनी काही विशिष्ट शब्दांचा वापर केला ज्यामुळे ते अडचणीत आले.
advertisement
3/5
हे शब्द सामान्य वाटू शकतात, परंतु त्यांचा वापर सुरक्षा एजन्सींना त्वरित सतर्क करतो. हे शब्द ऐकताच सुरक्षा कर्मचारी ताबडतोब कारवाई करतात, ज्यामुळे तुमचा प्रवास लांबू शकतो आणि कायदेशीर अडचणी देखील येऊ शकतात.
advertisement
4/5
आता हे शब्द कोणते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. विमानतळ किंवा विमानात बॉम्ब, बंदूक, चाकू, दहशतवादी, अपहरण, स्फोटकं, अपघात, जैविक शस्त्रे आणि तस्करी किंवा ड्रग्ज यासारखे शब्द अजिबात वापरू नयेत.
advertisement
5/5
उदाहरणार्थ, जर विमानतळावर किंवा विमानात कोणी गंमतीने म्हटले की, 'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे', तर त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं जाऊ शकतं.