TRENDING:

Do You Know : ती सुंदर राणी, जिने सत्तेसाठी स्वत:च्या सख्ख्या भावाशी केलं लग्न, इतिहासातील 'पवित्र विवाह'बद्दल क्वचित कोणाला माहित असेल

Last Updated:
इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी होऊन गेली, ज्यांनी केवळ त्यांची सत्ताच नाही तर त्यांचे खासगी आयुष्य आणि निर्णय यांनीही जगाला आश्चर्यचकित केले.
advertisement
1/10
ही सुंदर राणी का झाली स्वतःच्या भावाची पत्नी? कारण ऐकून धक्का बसेल
इतिहास अनेक रहस्यमय कथांनी, शैर्याच्या आणि अविश्वसनीय घटनांनी भरलेला आहे. काही व्यक्तिमत्त्वे अशी होऊन गेली, ज्यांनी केवळ त्यांची सत्ताच नाही तर त्यांचे खासगी आयुष्य आणि निर्णय यांनीही जगाला आश्चर्यचकित केले. यापैकीच एक असे नाव आहे एका राणीचं जिने राज्य आणि संपत्ती मिळवण्यासाठी आपल्या भावासोबतच लग्न केलं. आता तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल आणि याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा झाली असेल. चला जाणून घेऊ.
advertisement
2/10
या राणीचं नाव आहे क्लियोपात्रा (Cleopatra).
advertisement
3/10
क्लियोपात्रा ही सर्वात प्रसिद्ध फॅरो (शासक) तिच्या सौंदर्य, बुद्धिमत्ता, राजकीय चातुर्य आणि अनेक विवादास्पद निर्णयांसाठी ओळखली जाते. इतिहासात असा प्रसंग फार कमी दिसतो जिथे एका शक्तिशाली राणीने आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सख्ख्या भावाशीच विवाह केला. हा निर्णय केवळ राजकीय होता की यामागे आणखी काही कारणे होती, हे जाणून घेणे रंजक आहे.
advertisement
4/10
क्लियोपात्रा VII: इजिप्तची अखेरची महान फॅरोक्लियोपात्रा VII फिलोपेटर (Cleopatra VII Philopator) ही इजिप्तच्या टॉलेमी राजघराण्यातील शेवटची शासक होती. टॉलेमी राजघराण्यातील शासक मूळचे मॅसेडोनियन वंशाचे होते आणि अलेक्झांडर द ग्रेटच्या मृत्यूनंतर इजिप्तचे राज्य त्यांच्याकडे आले होते.
advertisement
5/10
सत्तेसाठी भावाशी विवाह करण्याची परंपरा:टॉलेमी राजघराण्यात, विशेषतः उच्च वर्गात, सख्ख्या भावा-बहिणींमध्ये विवाह करण्याची परंपरा होती. याचे मुख्य कारण असे होते की, ते राजघराण्याचे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आणि बाहेरील व्यक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असे करत असत. याला त्यांच्या संस्कृतीत 'पवित्र विवाह' (Sacred Marriage) मानले जात असे.
advertisement
6/10
क्लियोपात्राचा जन्म इ.स.पूर्व 69 मध्ये झाला. तिच्या वडिलांच्या निधनानंतर, इ.स.पूर्व 51 मध्ये ती तिच्या धाकट्या भाऊ टॉलेमी XIII (Ptolemy XIII) याच्यासोबत इजिप्तची सह-शासक (Co-ruler) बनली. टॉलेमी राजघराण्याच्या परंपरेनुसार, तिने त्याच्याशी विवाह केला. त्यावेळी क्लियोपात्रा सुमारे 18 वर्षांची होती आणि तिचा भाऊ अवघ्या 10 वर्षांचा होता.
advertisement
7/10
क्लियोपात्रा ही केवळ सुंदरच नव्हती तर ती अत्यंत बुद्धिवान, अनेक भाषांची जाणकार आणि कुशल राजकारणी होती. सत्तेवर आल्यानंतर, तिने आपल्या भावाला केवळ नाममात्र शासक ठेवले आणि स्वतःच खरी सत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. यामुळे अर्थातच भाऊ आणि बहिणीमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला.
advertisement
8/10
या काळात रोमन साम्राज्याची (Roman Empire) ताकद वाढत होती आणि इजिप्तवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित होत होते. क्लियोपात्राने रोमन सेनापती ज्यूलियस सीझर (Julius Caesar) आणि नंतर मार्क अँटनी (Mark Antony) यांच्याशी संबंध प्रस्थापित करून इजिप्तची सत्ता वाचवण्याचा आणि आपल्या भावांना (टॉलेमी XIII आणि नंतर टॉलेमी XIV) दूर सारण्याचा प्रयत्न केला.
advertisement
9/10
शेवटी तिने सीझरच्या मदतीने टॉलेमी XIII ला युद्धात हरवून ठार मारले आणि नंतर आपल्या दुसऱ्या भावा टॉलेमी XIV शी विवाह करून त्यालाही केवळ नाममात्र शासक बनवले. नंतर त्याचेही निधन झाले. क्लियोपात्राने आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि इजिप्तचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी अनेक कठोर आणि विवादास्पद निर्णय घेतले.
advertisement
10/10
क्लियोपात्राने सत्तेसाठी केलेल्या या विवाहांना आजही नैतिकतेच्या तराजूत तोलले जाते. पण टॉलेमी राजघराण्याच्या दृष्टीने ते रक्त शुद्ध ठेवणे आणि सत्ता बाहेरील लोकांच्या हातात जाऊ नये यासाठी आवश्यक मानले जात असे. तिचे जीवन आजही प्रेम, सत्ता, विश्वासघात आणि ऐतिहासिक संघर्षाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : ती सुंदर राणी, जिने सत्तेसाठी स्वत:च्या सख्ख्या भावाशी केलं लग्न, इतिहासातील 'पवित्र विवाह'बद्दल क्वचित कोणाला माहित असेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल