TRENDING:

Do You Know : ॲम्ब्युलन्ससाठी 102 आणि 108 दोन नंबर का? कोणत्यावेळी कोणतं वापरायचं 99 टक्के लोकांना ठावूकच नाही

Last Updated:
आरोग्यविषयक आपत्कालीन स्थिती उद्भवली, रस्ते अपघात किंवा एखादी दुर्घटना घडली तर संबंधित घटनेतील रुग्णांना तातडीचे उपचार देत पुढील उपचारांसाठी रुग्णालयात भरती करावे लागते. यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो. देशात रुग्णांसाठी 102 आणि 108 या दोन मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पुरवल्या जातात. आपत्कालीन स्थितीत ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी फोनवरून 102 आणि 108 हे क्रमांक डायल करावे लागतात. खरं तर या दोन प्रकारच्या ॲम्ब्युलन्स आहेत. या दोन्ही सेवांमध्ये फरक आहे. या दोन्ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहेत. या दोन्ही ॲम्ब्युलन्समध्ये नेमका फरक कोणता ते सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7
ॲम्ब्युलन्ससाठी 102 आणि 108 दोन नंबर का? 99 टक्के लोकांना फरक ठावूकच नाही
देशभरात 102 आणि 108 या दोन प्रकारच्या वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्स सेवा आहेत. या ॲम्ब्युलन्स आपत्कालीन स्थितीत लोकांना तातडीचे उपचार आणि सुविधा देतात. तसेच त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयापर्यंत नेतात.
advertisement
2/7
102 आणि 108 या दोन्ही ॲम्ब्युलन्स सेवांमध्ये मोठा फरक आहे. खरं तर हे दोन स्वतंत्र फोन क्रमांक असून, त्यांचा वापर करून तुम्ही आपत्कालीन स्थितीत ॲम्ब्युलन्सची सेवा मिळवू शकता. आपत्कालीन स्थितीत लोकांना तत्काळ आणि मोफत उपचार सुविधा मिळावी हा या सेवेमागील मूळ उद्देश आहे.
advertisement
3/7
108 ही ॲम्ब्युलन्स सेवा ही सर्व प्रकारच्या आपत्कालीन उपचारांसाठी असते. यात दुर्घटना, हृदय रोग आदींचा समावेश असतो. ही सेवा सरकारी रुग्णालये आणि उपचार संस्थांशी जोडलेली असते.
advertisement
4/7
108 ॲम्ब्युलन्स सेवेत प्रगत लाईफ सपोर्ट सुविधा मिळतात. ही सेवा रात्रंदिवस उपलब्ध असते. या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
advertisement
5/7
102 ॲम्ब्युलन्स सेवा ही प्रामुख्याने गर्भवती महिला, नवजात बालकं आणि लहान मुलांसाठी असते. ही सुविधा खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांशी जोडलेली असते.
advertisement
6/7
102 ॲम्ब्युलन्समध्ये प्राथमिक लाईफ सपोर्ट मिळतो. ही सेवा रात्रंदिवस उपलब्ध असते. ही सेवा निःशुल्क असते. आपत्कालीन स्थितीत या दोन्ही ॲम्ब्युलन्स सुविधा निश्चितच सहाय्यक ठरतात.
advertisement
7/7
तुम्ही अडचणीत असाल तर पटकन या मोफत सेवांचा लाभ घेऊ शकता. इतर कुणाला मदत करण्यासाठीही तुम्ही या सेवांचा उपयोग करू शकताआणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : ॲम्ब्युलन्ससाठी 102 आणि 108 दोन नंबर का? कोणत्यावेळी कोणतं वापरायचं 99 टक्के लोकांना ठावूकच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल