Drinking Milk : 'या' देशांमध्ये दूध पिणं चांगलं मानलं जात नाही, काय आहे कारण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दूध हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. दूधामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही. त्यामुळे भारतातील लोक भरपूर दूध पिताना दिसतात. मात्र असेही देश आहेल जिथे दूध पिणं चांगलं मानलं जात नाही.
advertisement
1/9

दूध हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. दूधामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही. त्यामुळे भारतातील लोक भरपूर दूध पिताना दिसतात. मात्र असेही देश आहेल जिथे दूध पिणं चांगलं मानलं जात नाही.
advertisement
2/9
advertisement
3/9
चीनच्या जुन्या सभ्यतेमध्ये दूध पिणे चांगले मानले जात नव्हते. आजही अनेक चिनी नागरिकांसाठी चीज वापरल्याने मळमळ होते. येथे लोक दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळतात.
advertisement
4/9
विशेषतः दूध आणि दही. त्याचप्रमाणे, जपानमध्येही लोक दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करतात. असे असूनही या दोन्ही देशातील लोक तंदुरुस्त राहतात.
advertisement
5/9
द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जंगली प्राणी आणि पक्षी खाणाऱ्या चीनमधील लोक दूध पचवू शकत नाहीत.
advertisement
6/9
जन्मापासूनच त्यांना दूध पचण्यास त्रास होतो. त्यामुळे चिनी लोकांना चीज, तूप आणि लोणी फार कमी खायला आवडतात. यामुळेच चीनमध्ये दुग्धजन्य पदार्थांची मागणीही खूपच कमी आहे.
advertisement
7/9
जपानमध्ये दूध न वापरण्याचं कारण खूपच रंजक आहे. येथील पारंपारिक खाद्यपदार्थात दुधाला कधीच महत्त्व दिले गेलं नाही. कारण येथील 80 टक्के भाग हा डोंगरांचा असून येथे गाई-म्हशी पाळण्याची परंपरा नाही. त्यामुळे लोक दूध पीत नाहीत.
advertisement
8/9
गेल्या काही वर्षांत दुधाचं उत्पादन इतकं वाढू लागलं आहे की त्याचा वापर होत नाही. परिस्थिती अशी झाली आहे की दरवर्षी हिवाळ्यात सुमारे 5000 टन दूध वाया जाते. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये जबरदस्तीने दूध पाजलं जातं.
advertisement
9/9
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी लोकांना एक ग्लास अतिरिक्त दूध पिण्याचं आवाहन केलं होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मंत्री दूध पिताना दिसले, जेणेकरून लोकांनी यातून धडा घ्यावा. दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या 50 टक्क्यांपर्यंत सूट देत असूनही दूध ग्राहकांची मोठी कमतरता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Drinking Milk : 'या' देशांमध्ये दूध पिणं चांगलं मानलं जात नाही, काय आहे कारण?