TRENDING:

हत्ती लाडात आला...! 4 हत्तीणींच्या प्रेमात पडला, त्यानं जे केलं ते माणूस नाही करू शकत

Last Updated:
तुम्ही कधी 2 कबुतरांना किस करताना पाहिलंय? मोराच्या तालावर लांडोर नाचताना पाहिलीये? सांगण्याचा उद्देश एवढाच की, माणसांमध्ये जशी प्रेम भावना असते, आपला एखाद्या व्यक्तीवर जसा जीव जडतो, अगदी तसेच प्राणी आणि पक्षीसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांची प्रेमकहाणी साधीसुधी नसते बरं का, तेसुद्धा प्रेम आपलं मिळवण्यासाठी आकांडतांडव करतात. विश्वास बसत नसेल, तर ही माहिती पूर्ण वाचा. (आशिष त्रिवेदी, प्रतिनिधी / लखीमपूर)
advertisement
1/5
हत्ती लाडात आला! हत्तीणींच्या प्रेमात पडला, त्यानं जे केलं ते माणूस नाही करू शकत
एक हत्ती प्रेमात पडला, हे वाचायला कितीही गंमतीशीर वाटत असलं तरी हत्तीचं प्रेम त्याच्यासारखंच बलाढ्य असतं. त्यानं कोणावर जीवापाड प्रेम केलं की, तो अजिबात मागे हटत नाही. तो एवढा आक्रमक होतो की, त्याला आवरताना वनविभागाच्या नाकीनऊ येतं.
advertisement
2/5
दुधवा टायगर रिझर्व्ह हा उत्तर प्रदेशच्या लखीमपूर भागातला सुप्रसिद्ध व्याघ्रप्रकल्प. इथल्या एका हत्तीचा हत्तीणीवर भयंकर जीव जडला. तिच्यासाठी त्यानं पुढे जे केलं ते जास्त भयंकर आहे.
advertisement
3/5
गजराज असं या रोमियो हत्तीचं नाव. त्याचं वय फक्त 6 वर्षे. त्याच्या जवळच 4 हत्तीणींना बांधलं होतं. तो काळ गजराजसाठी अतिशय सुखद होता. मात्र जेव्हा या हत्तीणींना जंगलात चरायला नेलं. तेव्हा मात्र गजराज पिसाळला.
advertisement
4/5
आपली प्रेमिका नजरेसमोर नाही म्हटल्यावर गजराजला काय करावं आणि काय नको, काही सूचेना. त्यानं सगळी ताकद एकवटून आपल्या समोरच्या सळ्या तोडून टाकल्या आणि हत्तिणींचा शोध घेत जंगलात सैरवैर धावू लागला. <a href="https://news18marathi.com/tag/animal-news/">हत्ती</a> पिसाळल्याचं कळताच पूर्ण वनविभाग कामाला लागलं. अधिकाऱ्यांनी गजराजला चणे आणि केळ्यांचं गाजर दाखवलं, मात्र तो काही परत यायला तयार नाहीये, तो आपल्या प्रेमिकांच्या शोधात वणवण भटकतोय. संपूर्ण जिल्ह्यात हा सध्या चर्चेचा आणि <a href="https://news18marathi.com/tag/snake-news/">भीतीचा विषय</a> ठरलाय.
advertisement
5/5
दुधवा नॅशनल पार्कचे अधिकारी डॉ. रंगारंजू टी यांनी सांगितलं की, हा काळ हत्तींच्या प्रजननाचा आहे. यादरम्यान नर हत्तींमध्ये प्रचंड <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/is-it-safe-to-drink-milk-of-pregnant-animals-mhij-local18-1234915.html">हॉर्मोनल बदल</a> होतात. त्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारतो. त्यांना हत्तीणींच्या भेटीची ओढ लागते. जशी गजराजला चंपाकली आणि रूपकली हत्तीणींची ओढ लागली आहे. त्यांच्यासाठी त्यानं चक्क लोखंडाच्या सळ्या मोडल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हत्ती लाडात आला...! 4 हत्तीणींच्या प्रेमात पडला, त्यानं जे केलं ते माणूस नाही करू शकत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल