TRENDING:

OYO सोडा आता चर्चेत आलंय Love Hotel! जिथं विवाहित अधिकाऱ्यासोबत 10 वेळा गेल्या महापौर मॅडम

Last Updated:
Love Hotel : एका महिला महापौरांना तिच्या वैयक्तिक वर्तनामुळे राजीनामा द्यावा लागला. जनतेचा संताप आणि नगरसेवकांच्या विरोधानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/5
चर्चेत आलंय Love Hotel! जिथं विवाहित अधिकाऱ्यासोबत 10 वेळा गेल्या महापौर मॅडम
जपानमधील मायबाशीच्या महापौर अकिरा ओगावा यांच्यावर एका विवाहित अधिकाऱ्यासोबत दहा वेळा जपानी लव्ह हॉटेलला भेट दिल्याचा आरोप होता. ओगावा यांनी बऱ्याच काळापासून हे आरोप फेटाळून लावले होते. पण नंतर त्यांनी फेब्रुवारीपासून एका विवाहित वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत 10 पेक्षा जास्त वेळा हॉटेलला भेट दिल्याचे कबूल केसं. पण आपल्यात कोणतेही अनुचित संबंध नव्हते, हेसुद्धा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. महापौरांच्या म्हणण्यानुसार, ते फक्त वैयक्तिक आणि अधिकृत बाबींवर चर्चा करण्यासाठी हॉटेलला भेट देत होते.
advertisement
2/5
ही घटना समोर आल्यानंतर ओगावालाही मोठ्या प्रमाणात राजकीय दबावाचा सामना करावा लागला. तिच्या कृतींमुळे शहराची प्रतिष्ठा खराब झाली आहे असा दावा करत सात वेगवेगळ्या गटांनी तिच्या राजीनाम्याची मागणी केली. या वादाचा शहराच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला.
advertisement
3/5
जेव्हा नगर परिषदेने तिच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली तेव्हा ओगावाला राजीनामा देणं योग्य वाटलं. जनतेचा रोष इतका तीव्र झाला की त्यांना पद सोडावं लागलं. 25 नोव्हेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिला आणि 27 नोव्हेंबर रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.
advertisement
4/5
आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हे लव्ह हॉटेल्स काय आहेत. तर जपान आणि जगाच्या इतर भागात कपल्सना प्रायव्हेसी देण्यासाठी असलेले हे खास हॉटेल्स. इथं काही तासांसाठी किंवा संपूर्ण रात्रीसाठी खोल्या भाड्याने घेतल्या जातात.
advertisement
5/5
ते बहुतेकदा बाहेरील तेजस्वी निऑन दिवे आणि अद्वितीय खोलीच्या थीमद्वारे ओळखले जातात. जपानमध्ये त्यांना बुटीक हॉटेल्स किंवा फॅशन हॉटेल्स असंही म्हणतात. प्रायव्हेसी इतकी असते की गेस्ट आणि कर्मचाऱ्यांचीही अनेकदा भेट होत नाही. स्वयंचलित मशीन किंवा लहान खिडकीद्वारे पैसे दिले जातात. (सर्व फोटो प्रतीकात्मक, AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
OYO सोडा आता चर्चेत आलंय Love Hotel! जिथं विवाहित अधिकाऱ्यासोबत 10 वेळा गेल्या महापौर मॅडम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल