TRENDING:

Girija Name Meaning : कित्येक दिवस चर्चेत आहे गिरीजा नाव; या नावाचा अर्थ काय माहितीये?

Last Updated:
Girija Name Meaning : प्रत्येक नावामागे एखादी कथा, प्रतीकात्मक अर्थ किंवा धार्मिक संदर्भ असतो.  गिरीजा हे असंच एक अर्थपूर्ण, सौम्य आणि संस्कृतीने समृद्ध नाव आहे. गिरीजा हे नाव फक्त एक सुंदर उच्चार असलेलं नाव नाही, तर त्यामागे खोल धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.
advertisement
1/5
Girija Meaning : कित्येक दिवस चर्चेत गिरीजा नाव; या नावाचा अर्थ काय माहितीये?
अभिनेत्री गिरीजा ओक नॅशनल क्रश बनल्यानंतर देशभर तिच्या नावाची चर्चा होते आहे. तेव्हापासून कित्येक दिवस गिरीजा हे नाव चर्चेत आहे. पण गिरीजा या नावाचा अर्थ काय याचा तुम्ही विचार केला आहे का? गिरीजाही निळी साडी जितकी स्पेशल ठरली तितकंच स्पेशल तिचं नावही आहे. गिरीजा या नावाचा एक खास अर्थ आहे.
advertisement
2/5
गिरीजा हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. गिरी म्हणजे पर्वत आणि जा म्हणजे जन्मलेली. त्यामुळे गिरीजा याचा शब्दशः अर्थ होतो, पर्वतापासून जन्मलेली किंवा पर्वतराज हिमालयाची कन्या.  हा अर्थ थेट देवी पार्वतीशी संबंधित आहे. देवी पार्वती हिमालयाची कन्या असल्यामुळे त्यांना गिरीजा असंही नाव दिलं गेलं आहे. हिंदू धर्मात गिरीजा हे नाव देवी पार्वतीचं एक पवित्र नाव मानलं जातं.
advertisement
3/5
देवी पार्वती शक्ती, करुणा, मातृत्व आणि तपश्चर्येचं प्रतीक आहेत. पौराणिक कथांनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. त्यामुळे गिरीजा हे नाव केवळ सौंदर्याचे नव्हे, तर धैर्य, संयम आणि आत्मशक्तीचं प्रतीक मानलं जातं. (AI Generated Image)
advertisement
4/5
मराठी साहित्य, काव्य आणि भक्तिगीतांमध्येही देवी पार्वतीचं गिरीजा हे नाव आढळतं. त्यामुळे गिरीजा नावाला एक सांस्कृतिक खोली लाभलेली आहे. मराठी, हिंदी, संस्कृत तसंच इतर भारतीय भाषांमध्ये गिरीजा हे नाव आदराने घेतलं जातं. हे नाव पारंपरिक असलं तरी आजही आधुनिक काळात लोकप्रिय आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुलीला हे नाव देताना सौम्यता, शालीनता आणि संस्कार यांचा विचार केला जातो.
advertisement
5/5
पर्वतासारखी स्थिरता, देवी पार्वतीसारखी शक्ती आणि मातृत्वाची कोमलता या सर्व गुणांचा संगम गिरीजा या नावात दिसतो. त्यामुळेच गिरीजा हे नाव भारतीय संस्कृतीत आदर, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. (AI Generated Image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Girija Name Meaning : कित्येक दिवस चर्चेत आहे गिरीजा नाव; या नावाचा अर्थ काय माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल