3 मुलांच्या आईच्या प्रेमात पडली तरुणी, पती-पत्नीसारखं राहण्याचा हट्ट, पुढे घडलं असं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Young Woman Love Mother of 3 Children : 3 मुलांच्या आईच्या प्रेमात पडलेली तरुणी तिच्यासोबत तिच्या घरी राहायला गेली. तिच्या पतीनेही तिला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली. पण...
advertisement
1/7

आजवर तुम्ही बरीच प्रेम प्रकरणं ऐकली असतील. अगदी कित्येकांचे विवाहबाह्य संबंध असतात. मुलं झाली तरी... असंच एक प्रकरण पण या प्रकरणाने पोलीसही शॉक झाले आहेत. कारण एक तरुणी 3 मुलांची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात पडली आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/7
महिला-महिला आणि पुरुष-पुरुष असे लेस्बिनयन संबंध आता तुमच्यासाठी काही नवीन नसतील. पण या प्रकरणात मात्र एक तरुणी जी चक्क 3 मुलांची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात पडली आहे. इतकंच नव्हे तर आता तिला तिच्यासोबत पती-पत्नीसारखं राहायचं आहे.
advertisement
3/7
उत्तर प्रदेशमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. शाहजहांपूरमधील रितू आणि सहारनपूरमधील रेश्मा दोघींची सोशल मीडियावर ओळख झाली. रेश्मा 3 मुलांची आई, पण रितू तिच्या प्रेमात पडली. दोघंही पती-पत्नीसारखे काही दिवस फिरायलाही गेले होते. आता दोघींना पती-पत्नीसारखं एकत्र राहायचं आहे.
advertisement
4/7
रितूच्या कुटुंबाने रेश्माने आपल्या मुलीचं ब्रेनवॉश केल्याचा आरोप केला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे. त्यांना संशय आहे की रेश्मा आणि तिचा पती गुप्त हेतूने रितूला त्यांच्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
5/7
पण रितूने आपल्या कुटुंबाने आपल्याला मारहाण करत छळ केला आहे. त्यामुळे आपल्याला घरी परतायचं नसल्याचं सांगितलं तर रेश्माने आपल्या लग्नाला 9 वर्षे झाली पण आपल्याला नवऱ्याचं प्रेम हवं तसं कधीच मिळालं नाही, त्याने कधीच पती म्हणून पत्नीसारखं वागवलं नाही, असं सांगितलं.
advertisement
6/7
रेश्माच्या पतीने रितूला आपल्यासोबत आपल्या घरात राहण्यास परवानगी दिली. पण दोघींनीही याला नकार दिला आहे. रितूचा असा युक्तिवाद आहे की जेव्हा देशात अनेक मुले आणि मुली एकत्र राहत आहेत, तेव्हा ते का राहू शकत नाहीत? आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकत्र आनंदी राहू असं म्हटलं आहे.
advertisement
7/7
ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबासह पोलीसही शॉक झाले आहेत. एकीकडे दोन्ही महिला एकत्र राहण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय ते स्वीकारण्यास तयार नाहीत. सध्या या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पोलीस दोघींचं समुपदेशन करत आहेत. (सर्व फोटो प्रतीकात्मक : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
3 मुलांच्या आईच्या प्रेमात पडली तरुणी, पती-पत्नीसारखं राहण्याचा हट्ट, पुढे घडलं असं की...