Honeymoon : हनीमूनला जाताय! सामानाची बॅग हॉटेलच्या बाथरूममध्ये ठेवा; विचित्र वाटेल पण कपल्ससह कुटुंबासाठीही फायद्याचं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Honeymoon Tips : हनीमूनला गेल्यावर हॉटेल रूममध्ये बॅग बेड किंवा कपाटात ठेवणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे बाथरूममध्ये बॅग ठेवा, आता का? ते पाहुयात.
advertisement
1/5

लग्नानंतर बरेच कपल हनीमूनला जातात. आता बाहेर फिरायला जाणं म्हणजे हॉटेलमध्ये थांबणं आलं. जिथं आपण गेल्या गेल्या आपलं सामान किंवा बॅग बेडवर टाकतो किंवा कपाटात ठेवतो. पण हॉटेल रूममध्ये गेल्यावर बॅग सगळ्यात आधी बाथरूममध्ये ठेवावी. हे वाचायला विचित्र वाटत असेल पण त्याचा फक्त त्या कपल्सना नाही तर कुटुंबालाही फायदा आहे.
advertisement
2/5
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार हॉटेल रूममध्ये बॅग किंवा इतर सामान बेडवर बिलकुल ठेवू नये. आता तुम्ही म्हणाल बरं मग कपाटात ठेवू, तर ती चूकसुद्धा करू नका. मग आता बॅग ठेवायची कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
3/5
बेड किंवा कपाट आणि रूममधील इतर फर्निचर यामध्ये ढेकूण असू शकता हे ढेकूण तुमच्या सामानामध्ये जाऊ शकतात. ते तुम्हाला चावू शकतात शिवाय तुमच्यासोबत तुमच्या घरीही येतील आणि आपलं घर करतील.
advertisement
4/5
त्यामुळे ढेकूण कुठे नसतील तर ती जागा आहे बाथरूममध्ये. इथं बाथटब असतात जिथं तुम्ही तुमची बॅग ठेवू शकता. त्यामुळे सामानात ढेकूण जाणार नाहीत आणि ते तुमच्या घरापर्यंतही पोहोचणार नाहीत.
advertisement
5/5
हॉटेल रूममध्ये कुठे ढेकूण नाहीत ना हे संपूर्ण तपासून त्याची खात्री होईपर्यंत तुम्ही सामान बाथरूममध्ये ठेवा किंवा तुम्ही तिथं असेपर्यंतही सामान तिथंच ठेवण्यास काही हरकत नाही. पण तुम्ही बॅग बाथरूममध्येच ठेवणार असाल तर जेव्हा तुम्ही बाथरूमचा वापर कराल तेव्हा ती भिजणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Honeymoon : हनीमूनला जाताय! सामानाची बॅग हॉटेलच्या बाथरूममध्ये ठेवा; विचित्र वाटेल पण कपल्ससह कुटुंबासाठीही फायद्याचं