QR Code Intresting Facts : वाकडातिकडा दिसणारा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट स्क्रिन कशी काय उघडते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How QR Code Work : आपण दररोज किती तरी ऑनलाईन पेमेंट करतो. पेमेंटसाठी असलेलं यूपीआय पेमेंटचं स्कॅनर स्कॅन केलं की आपल्याकडे लगेच पेमेंट स्क्रिन ओपन होते. जिथं आपण पैसे टाकतो आणि पेमेंट करतो. हे सगळं कसं काय होतं? याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
1/5

QR म्हणजे Quick Response म्हणजेच लगेच प्रतिसाद देणारा एक 2D बारकोड. या चौकोनी कोडमध्ये काळे-पांढरे छोटे ब्लॉक्स म्हणजेच पिक्सल्स असतात, ज्यात टेक्स्ट स्वरूपात माहिती एन्कोड केलेली असते.
advertisement
2/5
जेव्हा तुम्ही मोबाइलचा कॅमेरा QR कोडवर ठेवता, तेव्हा स्कॅनर ऍप किंवा कॅमेरा फ्रेममधील इमेजमधील त्या ब्लॉक्सचे पॅटर्न ओळखून ते बायनरीमध्ये रुपांतरित करतं. स्कॅनरमधील डिकोडिंग लायब्ररी ही बायनरी माहिती पुन्हा टेक्स्टमध्ये रूपांतरित करते. या टेक्स्टमध्ये बहुतेक वेळा URL किंवा विशिष्ट URI स्कीम असते.
advertisement
3/5
उदा. एखादा QR कोड https://example.com/pay?order=123 असे URL ठेवतो किंवा UPI पेमेंटसाठी upi://pay?pa=merchant@upi&am=100 असा URI असू शकतो. डिकोड झाल्यावर ऍप तपासतं की हा टेक्स्ट कोणत्या प्रकारचा आहे, वेबसाइट लिंक आहे का, UPI किंवा इतर ऍप आहे.
advertisement
4/5
जर URL आढळला, तर ऍप सिस्टमला हे लिंक उघड अशी विनंती पाठवते. ऑपरेटिंग सिस्टीम (Android/iOS) त्या लिंकसाठी उपलब्ध ब्राउझर किंवा संबंधित ऍप उघडतं. जर URI स्कीम जसं UPI असेल, तर ती स्कीम हँडल करणारे पेमेंट ऍप निवडले जाते आणि ते थेट पेमेंट इंटरफेस दाखवतं.
advertisement
5/5
थोडक्यात QR मधील एन्कोड केलेला URL/URI स्कॅन होताच तुमच्या फोनला तो निर्देश दिला जातो आणि त्या निर्देशानुसार ब्राउझर किंवा पेमेंट ऍप लगेच उघडतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
QR Code Intresting Facts : वाकडातिकडा दिसणारा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट स्क्रिन कशी काय उघडते?