TRENDING:

Social Media : लाइक, शेअर, कमेंट न करतानाही ती पोस्ट पाहिली हे सोशल मीडियाला कसं कळतं?

Last Updated:
Social Media Facts : मी काहीच केलं नाही, तरी सोशल मीडियाला कसं कळलं की मला ही पोस्ट आवडली? याचं उत्तर आहे युझर बिहेव्हियर ट्रॅकिंग.  आजचं सोशल मीडिया फक्त लाइक्सवर  चालत नाही, तर आपण काय पाहतो, कसं पाहतो आणि किती वेळ पाहतो यावर चालतं.
advertisement
1/7
लाइक, शेअर, कमेंट न करतानाही ती पोस्ट पाहिली हे सोशल मीडियाला कसं कळतं?
आपण अनेकदा इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया वापरताना पोस्ट पाहतो, पण लाइक करत नाही, शेअर करत नाही, कमेंटही करत नाही. तरीसुद्धा काही वेळाने तशाच प्रकारच्या पोस्ट्स पुन्हा पुन्हा दिसायला लागतात. तेव्हा मनात प्रश्न येतो, मी काहीच केलं नाही, तरी सोशल मीडियाला कसं कळलं की मला ही पोस्ट आवडली? याचं उत्तर आहे युझर बिहेव्हियर ट्रॅकिंग.
advertisement
2/7
व्ह्यू टाइम सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल. अल्गोरिदमसाठी सर्वात मोठा इशारा म्हणजे तुम्ही पोस्ट किती वेळ पाहिली. रिल पूर्ण पाहिली का? व्हिडीओ अर्धवट थांबवून पाहिला का? इमेजवर काही सेकंद थांबलात का?  जर तुम्ही एखादी पोस्ट 2–3 सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहिली, तर अल्गोरिदमला समजतं की या युझरला हे कटेंट इंटरेस्टिंग वाटतंय.
advertisement
3/7
स्क्रोल स्पीड पाहिला जातो. आपण पोस्ट पाहताना लगेच स्क्रोल करतो की थोडा वेळ थांबतो हे अल्गोरिदम नोंदवत असतो. जर एखाद्या पोस्टवर तुमचा स्क्रोल स्लो झाला झाला, तर अल्गोरिदमला कळतं की तुमचं लक्ष तिथं अडकलं आहे.
advertisement
4/7
Reels किंवा Videos बाबतीत व्हिडीओ पॉझ केला, पुन्हा रिवाइंड केला, एकच रिल दोनदा पाहिली हे सगळं अल्गोरिदमसाठी हाय इंटरेस्ट सिग्नल्स असतात. कधी कधी लाइकपेक्षा रिप्ले जास्त महत्त्वाचा ठरतो. जर तुम्ही कॅप्शन पूर्ण वाचलं, रिड मोरवर क्लिक केलं तर अल्गोरिदम समजतो की तुम्हाला त्या विषयात रस आहे.
advertisement
5/7
पोस्ट पाहिल्यानंतर तुम्ही ते प्रोफाइल उघडलं, त्याच्या इतर पोस्ट्स पाहिल्या की हे अल्गोरिदमला स्पष्ट सांगत की तुम्ही यात इंटरेस्टेड आहात.  तुम्ही एखादा विषय सर्च केला, त्याच टॉपिकवर पोस्ट पाहिली तर अल्गोरिदम हे दोन्ही जोडतो. उदा. तुम्ही होम वर्कआऊट सर्च केलं आणि वर्कआऊट रिल थांबून पाहिली की पुढे फिटनेस कंटेट वाढतो.
advertisement
6/7
अल्गोरिदम कोणता ऑडिओ किती वेळ ऐकला, कोणत्या हॅशटॅगच्या पोस्ट्सवर थांबलात, कोणत्या कॅटेगिरीमध्ये वेळ घालवला यावरही लक्ष ठेवतो. तुम्ही कमेंट लिहिली नाही पण कमेंट उघडलं, स्क्रोल करून वाचलं  तरी अल्गोरिदमला कळतं की पोस्ट engage करतेय.
advertisement
7/7
म्हणून पुढच्यावेळी असं वाटलं की मी लाइक, शेअर, कमेंट केली नाही तरी हेच रिल्स का दिसतात तर लक्षात ठेवा, आजचं सोशल मीडिया अल्गोरिदम तुमच्या बोटांच्या हालचाली, थांबणं, पाहणं, वाचणं या सगळ्यावर लक्ष ठेवतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Social Media : लाइक, शेअर, कमेंट न करतानाही ती पोस्ट पाहिली हे सोशल मीडियाला कसं कळतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल