TRENDING:

Indian Railway : ट्रेनच्या वरच्या बर्थवर झोपली व्यक्ती, सोबत असलेल्या पांढऱ्या गोष्टीनं प्रवाशांना फुटला घाम, नक्की असं काय होतं?

Last Updated:
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय? या व्यक्तीने आपल्यासोबत आणलं की सगळ्यांना घाम फुटला
advertisement
1/7
ट्रेनमध्ये झोपली व्यक्ती, सोबतच्या पांढऱ्या गोष्टीनं लोकांना फुटला घाम, पण का?
भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सगळ्यांच्या खिशाला परवडणारा असतो, त्यामुळे असंख्य लोक याने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा काही मजेशीर, तर कधी अजब-गजब गोष्टी घडतात. या घटना कधी फक्त काही लोकांपुरत्याच मर्यादित राहतात, तर कधी त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर थेट व्हायरल होतात.
advertisement
2/7
काही व्हिडिओ इतके विचित्र असतात की जो पाहिल त्या सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्रेनच्या जनरल डब्यात एका प्रवाशाने असं काही केलं की बाकीचे प्रवासी थक्क झाले.
advertisement
3/7
गरमीच्या दिवसांत रेल्वेच्या डब्यांत श्वास घ्यायलाही त्रास होतो. वरच्या बर्थवर बसणं किंवा झोपणं तर अशक्यच वाटतं. तरीही, या व्हिडिओमध्ये एक प्रवासी वरच्या बर्थवर निवांत झोपला होता आणि त्याच्या खाली एक पांढरी गोष्ट होती. जी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटलं.
advertisement
4/7
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय या व्यक्तीने आपल्यासोबत आणलं की सगळ्यांना घाम फुटला. तर त्या व्यक्तीने आपल्यासोबत पांढरी गोष्ट आणली होती ती एक कुलर होती, जी त्या व्यक्तीने ट्रेनच्या सॉकेटमध्ये लावली होती आणि थंड हवेचा आनंद घेत तो ट्रेनच्या अपर बर्थवर निवांत झोपला होता. तर एवढ्या गर्मीत ट्रेनमध्ये सगळ्यांना एका जागेवर बसायला होत नव्हतं, ज्यामुळे घाम फुटत होता.
advertisement
5/7
खरंतर या व्यक्तीचं असं वागणं भारतीय रेल्वेच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. कारण ते सॉकेट फक्त कमी वीज खर्च करणाऱ्या उपकरणांसाठीच आहे. जसे मोबाईल फोन, पावर बँक किंवा लॅपटॉप. पण अशा ठिकाणी कूलरसारखे उच्च शक्तीचे उपकरण वापरणे हे स्पष्टपणे नियमभंगाची गोष्ट आहे आणि ती गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत मोडते.
advertisement
6/7
हे प्रकरण एका प्रवाशाने आपल्य कॅमेऱ्यात टिपला आणि सोशल मीडियावर शेअर केला. जो काही वेळातच हजारो लोकांनी पाहिला आणि कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
advertisement
7/7
गरमीपासून बचाव करण्यासाठी त्या प्रवाशाने हा उपाय शोधला असला तरी, त्याच्या या कृतीमुळे इतर प्रवाशांचा घाम फुटला आणि तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : ट्रेनच्या वरच्या बर्थवर झोपली व्यक्ती, सोबत असलेल्या पांढऱ्या गोष्टीनं प्रवाशांना फुटला घाम, नक्की असं काय होतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल