एकाच ठिकाणी एकाच वेळी चारही दिशेने येतात 4 ट्रेन, तरी टक्कर होत नाही, कसं काय? महाराष्ट्रात असलेल्या भारतातील अशा एकमेव रेल्वे स्टेशनची स्टोरी
- Published by:Priya Lad
 
Last Updated:
Indian Railway Diamond Crossing : भारतातील  एक असा रेल्वे पाइंट जिथं एकाच वेळी चारही दिशेने गाड्यात येतात. ट्रॅक एकमेकांना छेदतात, तरीही त्यांची टक्कर होत नाही. एकाच ठिकाणी चार रेल्वे क्रॉसिंग असलेले हे ठिकाण.
advertisement
1/5

 तुम्ही रेल्वे रूळ नीट पाहिले तर ते एकमेकांत गुंतलेले दिसतील. स्टेशनवर एका रेषेत आणि मोजकेच असलेले रेल्वे रूळ पुढे जाऊन विस्तारतात, त्यांची संख्या वाढते. हे रूळ एकमेकांना जोडलेलेही असतात ज्यामुळे ट्रेन आपला मार्ग बदलते. पण विचार करा. असाच रेल्वे मार्गांना जोडणारं भारतातील हे ठिकाण जिथं चार दिशेने चार गाड्या येतात. पण त्यांची टक्कर होत नाही.
advertisement
2/5
 चार दिशांवरील गाड्या येथून जातात. मुंबई-हावडा मार्ग, दिल्ली-चेन्नई मार्ग, काझीपेट-नागपूर मार्ग, नागपूर-इटारसी मार्ग. या सर्व मार्गांवर दररोज हजारो गाड्या धावतात, ज्यात राजधानी, दुरांतो, गरीब रथ आणि शेकडो सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
3/5
 आता प्रश्न असा उद्भवतो की, चारही दिशांनी गाड्या येत असताना टक्कर कशी होत नाही? याचं श्रेय इंटरलॉकिंग सिस्टीम आणि ऑटोमॅटिक सिग्नलिंग तंत्रज्ञानाला जातं. ही सिस्टीम अशा प्रकारे काम करते की एका वेळी फक्त एकाच ट्रेनला क्रॉसिंग पॉइंट ओलांडण्याची परवानगी असते. ट्रेन क्रॉसिंग ओलांडताच पुढील ट्रॅकसाठी सिग्नल सक्रिय होतो. यामुळे ट्रेनच्या हालचालीवर पूर्ण नियंत्रण मिळतं आणि कोणत्याही अपघाताची शक्यता कमी होते.
advertisement
4/5
 डायमंड क्रॉसिंग हे भारतीय रेल्वेच्या तांत्रिक कौशल्याचे आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. ते रेल्वेने वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेचं संतुलन कसं राखलं आहे हे दर्शवते. रेल्वे कर्मचारी आणि सिग्नल ऑपरेटर सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे हालचालींवर सतत लक्ष ठेवतात.
advertisement
5/5
 भारतातील असं हे एकमेव ठिकाण महाराष्ट्रातच आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर. जे सर्वात वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक आहे. <span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
एकाच ठिकाणी एकाच वेळी चारही दिशेने येतात 4 ट्रेन, तरी टक्कर होत नाही, कसं काय? महाराष्ट्रात असलेल्या भारतातील अशा एकमेव रेल्वे स्टेशनची स्टोरी