कोकणात एलियन्स? 20 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे उलगडणार मोठं रहस्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
एलियन्सबाबत बरेच दावे केले जातात. कुणी एलियन्सना पाहिल्याचा तर कुणी यूएफओ पहिल्याचं सांगतं, काही शास्त्रज्ञांनीही एलियन्सचं अस्तित्व असण्यास दुजोरा दिला आहे. याचदरम्यान कोकणात एलियन्सशीसंबंधित पुरावे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (शिवाजी गोरे,प्रतिनिधी/रत्नागिरी)
advertisement
1/5

एलियन्स खरंच आहेत की नाहीत माहिती नाही. पण एलियन्सबाबत बरेच दावे केले जातात. कुणी एलियन्सना पाहिल्याचा तर कुणी यूएफओ पहिल्याचा दावा करतात. काही शास्त्रज्ञांनीही एलियन्सचं अस्तित्व असण्यास दुजोरा दिला आहे. एलियन्स कुठे असू शकतात याचाही अंदाज व्यक्त केला आहे. याचदरम्यान कोकणात एलियन्सशीसंबंधित पुरावे सापडले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
2/5
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या परिसरात सुमारे 2000 कातळ शिल्पाच्या फोटोचा अभ्यास केला जात आहे. याचदरम्यान रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, गुहागर या तीन तालुक्यात प्राचीन कातळशिल्प आढळून आले आहेत. ज्यामुळे मोठं रहस्य उलगडणार आहे.
advertisement
3/5
दापोलीमध्ये एलियनसदृश्य कातळशिल्प आढळलं आहे. 20 हजार वर्षांपूर्वीचं हे कातळशिल्प. उंबर्ले गावातील गाढव खडक भागात आढळलं आहे. या कातळ शिल्पाचा अभ्यास केला जाणार असून संशोधकाची टीम दापोलीत दाखल झाली आहे.
advertisement
4/5
बंगळुरू आयआयटी आणि निसर्ग यात्री संस्थेचा यात समावेश आहे. ही कातळ शिल्प नेमकी कोणत्या काळातील आहेत. या कातळ शिल्पा मागील रहस्य नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे दापोलीत आढळलेल्या प्राचीन कातळ शिल्पाचं रहस्य उलगडलं जाणार आहे.
advertisement
5/5
पुरातत्त्व विभाग निसर्ग यात्री संस्था या संस्थेच्या पुढाकारणे भविष्यात या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे. सरकारकडून सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. पुढील काळात या ठिकाणी कातळ शिल्प संवर्धित करून ऐतिहासिक ठेवा जपण्याची काळाची गरज आहे.