TRENDING:

Weird Disease : हा असा कसा आजार! आईवडिलांसोबत जेवूच शकत नाही मुलगा

Last Updated:
एक असा मुलगा ज्याला कुटुंबासोबत जेवायचं असूनही तो जेवू शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल याला कारण आहे ते त्याला झालेला आजार.
advertisement
1/7
हा असा कसा आजार! आईवडिलांसोबत जेवूच शकत नाही मुलगा
जेवण ही एकच वेळ असते जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र येते. कित्येक कुटुंबात असा नियम असतो की सगळ्यांनी एकत्र जेवावं. सणवार असले की तेव्हाही कुटुंबासोबत एकत्र जेवण असतं.
advertisement
2/7
इंग्लंडमधील लीड्समध्ये राहणारा ग्रेसन व्हिटेकर नावाचा हा मुलगा ज्याला एक विचित्र आजार आहे, जो त्याला इतरांसोबत बसून जेवणाचा आनंद घेऊ देत नाही.  ग्रेसनने त्याच्या आयुष्यात कधीही सणासुदीच्या वेळीही कुटुंबासोबत जेवण केलं. त्याच्याशी संबंधित कोणत्याही आठवणी नाहीत. 
advertisement
3/7
तो त्याच्या रूमला लॉक करून एकटाच खोलीत बसायचा, त्यामुळे त्याचं कुटुंब दु:खी होतं. त्याचे पालक ॲलेक्स आणि डॉन लहानपणापासून त्याला त्याच्या खोलीत एकटं जेवताना पाहत आहेत. ज्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं.
advertisement
4/7
आजाराबाबत वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. असा हा आजार काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. मिररच्या रिपोर्टनुसार, ग्रेसनच्या या वैद्यकीय स्थितीला मिसोफोनिया म्हणतात.
advertisement
5/7
यामध्ये माणूस प्रत्येक आवाजावर भावुक होतो. लोकांच्या बोलण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंतचा आवाज त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो.
advertisement
6/7
ग्रेसनला ही समस्या लहानपणापासूनच होती आणि त्यामुळेच त्याला शाळा सोडावी लागली. तो कोणताही आवाज सहन करू शकत नाही.
advertisement
7/7
ग्रेसन आता घर सोडून वेगळा राहतो जेणेकरून त्याला कुटुंबातील कोणाचाही आवाज ऐकू नये. सध्या तो त्याची पार्टनर बेथसोबत राहतो, जिला त्याची स्थिती माहिती आहे. याशिवाय, ग्रेसन थेरपी देखील घेत आहेत, ज्यामुळे त्याची प्रकृती थोडी सुधारली आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Disease : हा असा कसा आजार! आईवडिलांसोबत जेवूच शकत नाही मुलगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल