TRENDING:

Mobile Interesting Facts : Low Power Mode किंवा Battery Saver किती पॉवर वाचवतो?

Last Updated:
Mobile Battery Saver Mode : मोबाईलची बॅटरी लो झाली की आपण लगेच बॅटरी सेव्हर मोड ऑन करतो, पण हा कसा काम करतो, किती बॅटरी वाचवतो माहिती आहे का?
advertisement
1/5
Mobile Interesting Facts : Low Power Mode किंवा Battery Saver किती पॉवर वाचवतो?
मोबाईलची चार्जिंग किंवा बॅटरी कमी होत आली की आपण बॅटरी सेव्ह मोड ऑन करतो. यासाठी आयफोनमध्ये लो पॉवर मोड असतो. तर अँड्रॉईड फोनमध्ये बॅटरी सेव्हर. हा मोड ऑन केल्याने तुमच्या उरलेल्या बॅटरी टाइममध्ये सरासरी 1.5 ते 4 तासांची वाढ होते.
advertisement
2/5
आता पॉवर मोडमध्ये पॉवर कसा वाचतो तर सीपीयू परफॉर्मन्स 40% पर्यंत कमी होतो.  सामान्य प्रोसेस कमी वेगाने चालतात आणि ऊर्जा वाचते. व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, जीमेल, लोकेशन अपडेट्स असे बॅकग्राऊंडमध्ये सतत चालणारे एप्स किंवा रिफ्रेश बंद होतं. तिथे ऊर्जा वाचते.
advertisement
3/5
डिस्प्ले हा फोनचा सर्वात जास्त बॅटरी खाणारा भाग आहे. बॅटरी पॉवर सेव्हिंग मोड सुरू केल्याने स्क्रिन ब्राइटनेस, रिफ्रेश रेट कमी होतो.  मेल फेच बंद होतं, एनिमेशन आणि इफेक्ट्स कमी होतात, जीपीयूवरचा लोड कमी होतो.  लो पॉवर मोडमध्ये काही फोनवर 4G नेट वापरला जातो. 5G मध्ये जास्त बॅटरी लागते.
advertisement
4/5
आयफोनमध्ये लो पॉवर मोड ऑन केल्यानंतर सामान्यतः 30% ते 47% पर्यंत पॉवर बचत होते. एपलच्या चाचण्यांनुसार LPM ऑन केल्यावर बॅटरी लाइफ 1.5–3 तास अधिक मिळते.
advertisement
5/5
अँड्रॉईडमध्ये नॉर्मल बॅटरी सेव्हरमध्ये 20%–30% पर्यंत पॉवर बचत होते. तर अल्ट्रा किंवा एक्स्ट्रीम मोडमध्ये  50% ते 70% पर्यंत पॉवर वाचते. सॅमसंग, ओपो, विवो, झिओमी सारखे  काही ब्रँड्सवर अल्ट्रा मोडने फोन 12–24 तास जास्त चालतो, अगदी 5–10% बॅटरी शिल्लक असली तरी. (सर्व फोटो : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : Low Power Mode किंवा Battery Saver किती पॉवर वाचवतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल