बाबो! 28 कोटी रुपयांना विकला गेला फक्त एक मासा, असं यात आहे काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rs. 29 Crore Fish : फार फार तर एखाद्या माशाची किंमत जास्तीत जास्त किती असेल काही हजार, लाख... हा आकडापण आपल्याला मोठा वाटतो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. एक मासा जो तब्बल 29 कोटी रुपयांना विकला गेला आहे.
advertisement
1/5

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे आणि किमतीचे मासे मिळतात. जे अगदी काही शे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत असतात. पण 29 कोटी रुपयांना फक्त एक मासा हे वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल.जपानच्या टोयोसु फिश मार्केटमध्ये या माशाची विक्री झाली आहे. या मार्केटमध्ये वर्षाचा पहिला लिलाव नेहमीच चर्चेचा विषय असतो, पणयावेळी या माशाच्या विक्रीन सगळ्यांना धक्का दिला आहे. लिलावाच्या जगात त्याने इतिहास रचला आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
2/5
हा मासा आहे ब्लूफिन ट्यूना. जो उत्तर जपानमधील ओमाच्या किनाऱ्यावर पकडला गेला, हा उच्च दर्जाचा ट्युना मासा. 243 किलो वजनाचा हा मासा 510 दशलक्ष येन म्हणजे 29 कोटी रुपयांहून अधिक किमतीला विकला गेला. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
3/5
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मासा इतक्या उच्च किमतीत कोणी विकत घेतला आणि का? मीडिया रिपोर्ट्सनुसार हा ब्लूफिन टुना मासा जपानच्या आघाडीची सुशी चेन सुशी झनमाईची मूळ कंपनी कियोमुरा कॉर्पोरेशनने खरेदी केला. कंपनीचे मालक कियोशी किमुरा ज्यांना टुना किंग म्हणून ओळखलं जातं, त्यांनी बोली जिंकली. त्यांनी 2019 चा स्वतःचाच विक्रम मोडला, जेव्हा त्यांनी 19 कोटींहून अधिक बोली लावून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
4/5
आता असं या माशात इतकं काय आहे की, तो इतका महाग का विकला गेला? तर जपानमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पहिल्या लिलावात सर्वात मोठा मासा खरेदी करणं शुभ मानलं जाते. व्यवसायात ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. इतक्या उच्च बोलीमुळे सुशीझानमाईला जगभरात मोफत प्रसिद्धी मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. (फोटो : सोशल मीडिया)
advertisement
5/5
आता ही कंपनी या माशाचं काय करेल, तर तुम्हाला वाटेल की ते आणखी जास्त किमतीला विकतील. तर कंपनीच्या मालकांनी सांगितलं की, ही खरेदी नफ्यासाठी नव्हती, तर ग्राहकांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी होती. लिलावानंतर ब्लूफिन टूना सर्व सुशीझानमाई आउटलेटवर पाठवण्यात आला, जिथं तो ग्राहकांना नियमित सुशी किमतीत दिला जात आहे. (फोटो : सोशल मीडिया)