Intresting Facts : I'm not a robot यावर फक्त क्लिक करून आपण रोबो नाही माणूस आहे हे कसं काय समजतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
I'm not a robot : यामागे मोठ्या प्रमाणात बीहॅव्हिअरल अनालिसिस म्हणजे वर्तन विश्लेषण रिस्क अनालिसिस म्हणजे धोक्याचं मूल्यमापन यांचा समावेश आहे.
advertisement
1/5

इंटरनेट वापरताना तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेबसाईटवर तुम्हाला I’m not a robot असा एक मजकूर दिसतो. ज्याच्यासमोर एक बॉक्स असतो त्यावर क्लिक केल्यानंतर ती लिंक ओपन होते. गुगलचा हा reCAPTCHA जो तुम्ही माणूस आहे की रोबो हे ठरवतो. पण फक्त एक क्लिक करून आपण रोबो नाही माणूस आहोत, हे कसं काय बरं समजतं? असा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. यामागे मोठ्या प्रमाणात बीहॅव्हिअरल अनालिसिस म्हणजे वर्तन विश्लेषण रिस्क अनालिसिस म्हणजे धोक्याचं मूल्यमापन यांचा समावेश आहे.
advertisement
2/5
पृष्ठ पेज लोड होतं आणि टिकबॉक्स दिसते, तेव्हा क्लिक करताना तुमचं माउस हलण्याचं पॅटर्न, कर्सरचा प्रवास, हालचाल इत्यादी गोष्टी बघितल्या जातात. बोट कसं हलतं, पाईँटर कसा एका बिंदूपासून दुसऱ्याकडे जातो, क्लिक करताना मायक्रो शेकिंग म्हणजे किंचित हालचाल होते का? क्लिक सरळ रेषेत जातं की वळण घेत, क्लिकचा वेळ किती आहे?
advertisement
3/5
मानवाच्या हालचाली रँडम असतात. त्यात लहान नैसर्गिक अनियंत्रित बदल दिसतात, पण रोबोटच्या हालचाली त्या प्रमाणात नैसर्गिक नसतात. त्या खूप परफेक्ट असतात तो स्ट्रेट क्लिक करतो.
advertisement
4/5
reCAPTCHA तुमचं डिव्हाइस, ब्राऊझर आणि बॅकग्राऊंड अक्टिव्हिटीही तपासतो. म्हणजे तुम्ही आधी कोणत्या वेबसाइट्स वापरल्या, तुम्ही आधी CAPTCHAs solve केले आहेत का? कुकीज, जाव्हास्क्रिप्ट मुव्हमेंट, ब्राऊझर विश्वासार्ह आहे का? तुमचा आयपी एड्रेस अशी सगळी माहिची जमा करतो. ही सर्व माहिती अदृश्यरित्या व्हेरिफाय केली जाते.
advertisement
5/5
एकंदर काय तर त्या एका क्लिकच्या आधी आणि नंतरचं वर्तन, ब्राउझर हिस्ट्री यांचा अभ्यास केला जातो. तुमचं क्लिक Human-like आहे का? तुमचा ब्राउझर genuine आहे का? तुमचा device किंवा IP suspicious आहे का? या तीन गोष्टी एकत्र करून सिस्टम 100% human verification करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Intresting Facts : I'm not a robot यावर फक्त क्लिक करून आपण रोबो नाही माणूस आहे हे कसं काय समजतं?