Ramayan Story : 14 वर्षे वनवासात जात असताना माता सीता यांना कुणी दिली होती साडी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
रामायणातील कथा तुम्ही वाचल्या असतील किंवा टीव्हीवर रामायण पाहिलं असेल. यात बऱ्याच अशा अद्भुत घटनांचा उल्लेख आहे. यातील काही गोष्टी तर अनेकांना माहिती नाहीत.
advertisement
1/5

भगवान रामांना वडिलांनी 14 वर्षे वनवासात जाण्याचा आदेश दिला. यानंतर राम वनवासाला निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि लहान भाऊ लक्ष्मणही वनवासात गेला.
advertisement
2/5
तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की संपूर्ण वनवासात प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण या तिघांनीही पिवळी वस्त्रं परिधान केली होती.
advertisement
3/5
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माता सीता 14 वर्षांच्या वनवासात एकच साडी नेसल्या होत्या, असं सांगितलं जातं. ही साडी दिसायला साधी पण खूप खास होती.
advertisement
4/5
वनवासाता माता सीता यांची ती साडी एक दिव्य किंवा चमत्कारिक साडी होती असं म्हणतात. या साडीची खासियत म्हणजे ती फाटत नव्हती आणि मळतही नव्हती.
advertisement
5/5
ही साडी माता सीताला दिली कुणी? तर माता अनुसूयाने. वनवासात जाण्याआधी राम, सीता आणि लक्ष्मण ऋषी अत्रिंच्या आश्रमात गेले होते. तिथं त्यांची पत्नी अनसूयाने सीतेला ही साडी दिली होती. जी माता अनसूयाला अग्निदेवाकडून मिळाली असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ramayan Story : 14 वर्षे वनवासात जात असताना माता सीता यांना कुणी दिली होती साडी?