खरंच की काय? थप्पड मारल्याने बरा होतो डायबेटिज आणि बीपी; थेरेपीची संपूर्ण माहिती
- Published by:Priya Lad
Last Updated:
हा विचित्र उपचार अंधश्रद्धा नाही, यामागे वैद्यकीय विज्ञान आहे. याला स्लॅपिंग थेरपी म्हणतात.
advertisement
1/6

डायबेटिस, रक्तदाबावर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारची औषधं आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की जगात अनेक ठिकाणी गालावर मारून हे आजार बरे केले जातात. ही अंधश्रद्धा नाही, यामागे वैद्यकीय विज्ञान आहे. याला स्लॅपिंग थेरपी म्हणतात.
advertisement
2/6
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, स्लॅपिंग थेरपीची सुरुवात चीन आणि कोरियामधून झाली. चीन, हाँगकाँग, तैवान, मलेशिया आणि सिंगापूर इथं मोठ्या प्रमाणात याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. अलीकडे भारत, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियातही अशा कार्यशाळा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत.
advertisement
3/6
मधुमेह, रक्तदाब यासारख्या समस्याही दूर होतात. अनेक असाध्य रोग जे औषधानेही बरे होत नाहीत ते या थेरपीने बरे होऊ शकतात. सर्दी, अंगदुखी, अल्झायमर, पक्षाघात, अर्धांगवायू, किडनी निकामी आणि अगदी कर्करोग आणि ऑटिझम बरे करण्याचे दावे इथं केले जातात.
advertisement
4/6
शरीराच्या विविध भागांवर, विशेषत: सांधे आणि डोक्यावर जोरदार चापट मारली जाते. त्वचा लाल होईपर्यंत किंवा दुखू लागेपर्यंत मारलं जातं. अनेकवेळा रुग्ण मोठ्याने ओरडता तरीही मारणारे थांबत नाही. वेदना असह्य आहेत, लोक रडतात, तरीही मारलं जातं. परंतु बहुतेक लोक आपण बरं झाल्याचा दावा करतात.
advertisement
5/6
तज्ज्ञांच्या मते, जिथं रक्ताची गुठळी असेल तिथं जोरदार प्रहार दिला जातो. थप्पड मारल्याने रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात, अशी यामागची धारणा आहे.
advertisement
6/6
डॉक्टरांचं म्हणणं आहे की स्लॅप केलेल्या जागेवर रंगीबेरंगी डाग, ढेकूळ आणि सूज पाहून घाबरू नका, या चांगल्या उपचार प्रतिक्रिया आहेत. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
खरंच की काय? थप्पड मारल्याने बरा होतो डायबेटिज आणि बीपी; थेरेपीची संपूर्ण माहिती