FREE जेवण आणि पैसेही मिळतात! अनोखं रेस्टॉरंट जिथं वेटर भरतो ग्राहकांचं बिल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Unique Restaurant : भारतातील अनेक ग्राहकांना रेस्टॉरंटच्या जास्त बिलामुळे भीती वाटते, पण इथं ग्राहक आनंदाने आणि खिशात पैसे घेऊन जातात.
advertisement
1/7

एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला पैसे द्यावे लागत नाही, वेटरच ग्राहकाचं बिल भरतो. असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. पण असं एक रेस्टॉरंट आहे.
advertisement
2/7
इथं ग्राहकाने आनंदाने जेवतात. त्या बदल्यात त्यांना पैसे द्यावे लागत नाही. उलट या ग्राहकांना वेटरकडून पैसे मिळतात. आता हे कसं काय? आणि हे हॉटेल कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल.
advertisement
3/7
ही असामान्य परंपरा कॉस्प्ले संस्कृतीने प्रेरित आहे आणि तरुणांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. हे एक पॉप-अप आउटलेट आहे जिथं ग्राहक जेवताना वेटर किंवा वेट्रेस बनून त्यांची आवड पूर्ण करू शकतात.
advertisement
4/7
म्हणजे रेस्टॉरंट ग्राहकांना वेटरचा ड्रेस देतं आणि ग्राहक वेटर बनून कर्मचाऱ्यांना जेवण वाढवतात.याचा अर्थ कर्मचारी बसून जेवतात, तर ग्राहक सेवा देतो
advertisement
5/7
या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक वेटर बनण्याच्या बदल्यात रेस्टॉरंट जो त्यांच्यासाठी तात्पुरता ग्राहक आहे त्याला फक्त 90 मिनिटांच्या सेवेसाठी 4000 येन किंवा सुमारे 25 डॉलर्स देतात.
advertisement
6/7
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, हे फक्त मनोरंजनासाठी आहे, प्रत्यक्ष सेवेसाठी नाही. तरुण लोक या अनुभवाचा आनंद घेत आहेत. रेस्टॉरंटचं नाव उघड केलं गेलं नाही, पण ते एक पॉप-अप शैली आहे, म्हणजे तात्पुरतं सेटअप आहे. जे जपानमध्ये आहे.
advertisement
7/7
सोशल मीडियावर अनेक तरुणांमध्येही या ट्रेंडची चर्चा होत आहे. अनेक विद्यार्थी या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत आणि पोस्ट शेअर करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
FREE जेवण आणि पैसेही मिळतात! अनोखं रेस्टॉरंट जिथं वेटर भरतो ग्राहकांचं बिल