TRENDING:

Road Lines : रस्त्यावरील पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा काय दर्शवतात? 90 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
तुम्ही गाडीने हायवेवरून जाताना किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा पाहिल्या असतील. यापैकी काही रेषा या सरळ, काही डबल तर काही तुटक, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या सुद्धा असतात. मात्र बऱ्याचदा या रेषा नेमक काय दर्शवतात हे माहित नसतं. तेव्हा रस्त्यावरील विविध प्रकारच्या रेषां मागचा नेमका अर्थ काय याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5
रस्त्यावरील पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा काय दर्शवतात?
जर रस्त्याच्या मधोमध तुम्हाला पांढऱ्या रंगाची एकसंध जाडसर रेषा दिसली. तर याचा अर्थ तुम्ही ही रेष ओलांडून पलीकडे जाऊ नये. पांढऱ्या एकसंध रेषेचा अर्थ तुम्ही ज्या लेनमधून गाडी चालवत आहात त्याच लेनमधून गाडी चालवा, संबंधित लेन ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जाऊ नका असा याचा अर्थ होतो. जर ती लाईन क्रॉस करताना एखाद्या ट्राफीक पोलिसांने तुम्हाला पकडलं तर ते तुम्हाला फाईन मारु शकतात.
advertisement
2/5
जर रस्त्यावर पांढरी तुटक रेषा असेल तर तुम्ही वाहन चालवताना तुमची लेन बदलू शकता असा याचा अर्थ असतो. परंतू लेन बदलत असताना इतर वाहनांना याबाबतचे इंडिकेटर द्यायला विसरू नका.
advertisement
3/5
रस्त्याच्या मधोमध पिवळ्या रंगाची एकसंध रेष असेल तर तुम्ही गाडी चालवत असताना इतर वाहनांना ओव्हरटेक करू शकता असा याचा अर्थ असतो. परंतु असे करताना तुम्ही पिवळ्या रेषेच्या बाहेर जाऊ नये. पिवळ्या एकसंध रेशबाबत विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. तेलंगणा येथे पिवळी रेघ रस्त्यावर असताना, इतर गाड्यांना ओव्हरटेक करू नये असा संकेत असतो .
advertisement
4/5
जर रस्त्यावर एकसंध पिवळ्या रेषेच्या बाजूला तुटक पिवळी रेषा असेल आणि तुम्ही तुटक पिवळ्या रेषेच्या बाजूने गाडी चालवत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करू शकता. पण जर तुम्ही एकसंध पिवळ्या रेषेच्या बाजूने गाडी चालवत असाल तर वाहनांना ओव्हरटेक न करणे असा त्याचा अर्थ असतो.
advertisement
5/5
रस्त्याच्या मधोमध जर दोन एकसंध पांढऱ्या रेषा असतील तर याचा अर्थ तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. जिथे जिथे दोन रेषा असतील तिथे तिथे एकाच लाईनीने गाडी चालवावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Road Lines : रस्त्यावरील पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेषा काय दर्शवतात? 90 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल