TRENDING:

ATM मधून फक्त पैसे नाही, ही 7 कामही करता येतात, बँकेत जाण्याची ही गरज नाही, तुम्हाला हे माहितीय का?

Last Updated:
अशी अनेक ठिकाणं आहे जिथे आजही कॅश किंवा रोख रक्कम वापरली जाते, ज्यामुळे लोकांना एटीएमची गरज भासते. आपण ATM मशिनचा वापर पैसे काढण्यासाठी करतो. यामुळे तुम्ही कोणत्याही शहरातून तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढू शकता.
advertisement
1/11
ATM मधून फक्त पैसे नाही, ही 7 कामही करता येतात, बँकेत जाण्याची ही गरज नाही
जग आता पुढे गेलं आहे. कॅश काढण्यासाठी आधी ATM चा वापर केला जायचा, ज्यामुळे लोकांचा वेळ वाचायचा आणि कोणत्याही वेळी गरजेला पैसे मिळत असत. पण आता काळ बदलला आहे. आता सगळेच लोक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत, ज्यामुळे लोकाना पैसे जवळ ठेवण्याची आणि ते चोरी होण्याची काळजीच संपली. शिवाय डिजिटल पेमेंटमुळे तुम्ही कुठे आणि कोणाला किती पैसे दिले याचा रेकॉर्ड ठेवणं सोपं जातं.
advertisement
2/11
असं असलं तरी देखील अशी अनेक ठिकाणं आहे जिथे आजही कॅश किंवा रोख रक्कम वापरली जाते, ज्यामुळे लोकांना एटीएमची गरज भासते. आपण ATM मशिनचा वापर पैसे काढण्यासाठी करतो. यामुळे तुम्ही कोणत्याही शहरातून तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढू शकता.
advertisement
3/11
पण तुम्हाला माहित आहे का, ATM म्हणजे फक्त पैसे काढण्यासाठीच नसतं? तर त्याचे अजूनही अनेक फायदे किंवा काम आहे ज्यांच्याबजद्दल आजही अनेकांना माहिती नाही. पूर्वी एटीएमचा वापर फक्त कॅश विड्रॉ किंवा कॅश डिपॉझिटसाठी केला जायचा. पण आता एका मशीनमधून अनेक बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. चला, जाणून घेऊया अशा 7 महत्त्वाच्या सेवा, ज्या तुम्ही एटीएमच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने घेऊ शकता.
advertisement
4/11
1. बॅलन्स चेकतुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी एटीएम सर्वात सोपा पर्याय आहे. फक्त कार्ड टाका आणि ‘Balance Enquiry’ निवडा. स्क्रीनवर लगेच तुमची उपलब्ध रक्कम दिसेल. हवं असल्यास मिनी स्टेटमेंटद्वारे अलीकडच्या व्यवहारांचं तपशीलवार विवरणही पाहू शकता
advertisement
5/11
2. मिनी स्टेटमेंटएटीएमवरून तुम्ही तुमच्या खात्यातील मागील काही व्यवहारांची यादी मिळवू शकता. सामान्यतः 5 ते 10 व्यवहारांचा तपशील तिथे मिळतो. यामुळे तुम्हाला लगेच समजतं की अलीकडे कुठे खर्च झाला किंवा कुठून पैसे आले.
advertisement
6/11
3. फंड ट्रान्सफरकाही बँकांच्या एटीएममध्ये आता थेट एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा आहे. जर दोन्ही खाते एकाच बँकेतील असतील, तर ट्रान्सफर लगेच आणि सुरक्षितपणे होते. त्यामुळे बँकेत जाण्याची गरज उरत नाही.
advertisement
7/11
4. पिन बदल किंवा नवीन पिन जनरेटसुरक्षेच्या दृष्टीने ही एक अत्यंत उपयुक्त सुविधा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा ATM PIN कुणाला माहिती झाला आहे किंवा तो नियमित बदलायचा आहे, तर एटीएममधूनच तुम्ही नवीन पिन तयार करू शकता. अगदी नवीन कार्डसाठीही पिन जनरेट करण्याची सुविधा यात असते.
advertisement
8/11
5. मोबाइल नंबर अपडेट / रजिस्ट्रेशनबँकेत न जाता तुम्ही तुमचा नवीन मोबाइल नंबर एटीएमद्वारे नोंदवू शकता. काही बँकांमध्ये ही सुविधा दिली जाते. त्यामुळे नवीन नंबरवर तुम्हाला बँकेचे एसएमएस अलर्ट आणि व्यवहारांची माहिती मिळत राहते.
advertisement
9/11
6. बिल पेमेंटकाही अपडेटेड एटीएम मशीनद्वारे आता तुम्ही वीज, पाणी, गॅस, मोबाइल रिचार्ज अशा अनेक बिलांचे थेट पेमेंट करू शकता. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटचे टप्पे किंवा लांबलचक रांगा टाळून व्यवहार काही सेकंदांत पूर्ण होतात.
advertisement
10/11
7. चेकबुक किंवा स्टेटमेंटची विनंतीएटीएमद्वारे तुम्ही नवीन चेकबुक किंवा खाते स्टेटमेंट मागवू शकता. विनंती केल्यानंतर बँक ही कागदपत्रं तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवते. त्यामुळे लहान बँकिंग कामांसाठी शाखेत जाण्याची आवश्यकता उरत नाही.
advertisement
11/11
आजचं एटीएम म्हणजे फक्त कॅश मशीन नाही, तर एक स्मार्ट बँकिंग हब आहे. बॅलन्स चेकपासून बिल पेमेंटपर्यंत, पिन बदलापासून फंड ट्रान्सफरपर्यंत सगळं काही काही मिनिटांत करता येतं. या सुविधा वापरून तुम्ही वेळही वाचवू शकता आणि कुठेही, कधीही बँकिंगचा अनुभव घेऊ शकता तेही बँकेच्या शाखेत न जाता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
ATM मधून फक्त पैसे नाही, ही 7 कामही करता येतात, बँकेत जाण्याची ही गरज नाही, तुम्हाला हे माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल