TRENDING:

DMart चं जुणं नाव काय? अनेक वर्षांपासून खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही माहित नसेल उत्तर

Last Updated:
डी-मार्ट ही साखळी भारतातील 11 राज्यांमध्ये 375 हून अधिक स्टोअर्ससह कार्यरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये याचा विस्तार असून आता ही कंपनी भारतात इतर भागांतही पाय रोवू पाहत आहे.
advertisement
1/7
DMart चं जुणं नाव काय? 99 टक्के ग्राहकांनाही माहित नसेल उत्तर
महागाईनं हैराण झालेल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या गरजांच्या वस्तूंची खरेदी करताना बजेट सांभाळणं गरजेचं असतं. म्हणू या सगळ्यात अनेक लोकांची पसंती मिळाली आहे डी मार्टला. इथे लोकांना उत्तम दर्जेचं सामान मिळतं आणि ते ही एमआरपीपेक्षा एकदम कमी, ज्यामुळे बहुतांश लोक इथूनच सामानाची खरेदी करतात.
advertisement
2/7
डी-मार्ट ही साखळी भारतातील 11 राज्यांमध्ये 375 हून अधिक स्टोअर्ससह कार्यरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये याचा विस्तार असून आता ही कंपनी भारतात इतर भागांतही पाय रोवू पाहते आहे.
advertisement
3/7
डी-मार्टची स्थापना 2002 साली प्रसिद्ध उद्योगपती राधाकिशन दमानी यांनी केली. दमानी यांनी 1980 च्या दशकात शेअर बाजारातून प्रचंड पैसा कमावला होता. पण त्यांनी तो पैसा समाजोपयोगी आणि दूरदृष्टी ठेवून वापरण्याचा निर्णय घेतला आणि तीच डी-मार्ट कंपनी किंवा डी-मार्ट आहे.
advertisement
4/7
पण तुम्हाला डीमार्टचा फुल फॉर्म माहितीय का किंवा त्याचं सुरुवातीचं नाव माहिती आहे का? अनेकांना आता हे वाचून आश्चर्य वाटेल आणि खरंच डी-मार्टचा फुलफॉर्म आहे का? असा प्रश्न पडेल. पण हे खरं आहे.
advertisement
5/7
खरंतर डी-मार्टचं आधीच नाव ‘दमानी मार्ट’ होतं. याचे मालक दमानिया यांनी या नावाने व्यवसाय सुरू केला. नंतर याचे नाव बदलून ‘डी-मार्ट’ असं करण्यात आलं.
advertisement
6/7
डी-मार्टचं यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा कमी किमतीत दर्जेदार वस्तू विकण्याचा निर्धार. हे शक्य होतं कारण ही दुकाने स्वतःच्या मालकीच्या इमारतीतच सुरू केलेली आहेत. त्यामुळे त्यांना भाडं द्यावं लागत नाही आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो.
advertisement
7/7
याशिवाय डी-मार्टमध्ये उपलब्ध असलेली बहुतांश उत्पादने घरेलू आणि दर्जेदार असतात. यामुळे ग्राहकांचा या ब्रँडवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आज डी-मार्ट हे केवळ एक रिटेल दुकान न राहता सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं आहे. लोक इथे फक्त वस्तू घेण्यासाठी येत नाहीत, तर विश्वासानं, समाधानी अनुभवासाठी येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
DMart चं जुणं नाव काय? अनेक वर्षांपासून खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही माहित नसेल उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल