General Knowledge : पावसात ढग का गडगडतात? खरंच ते एकमेकांना आपटतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rainy cloud : ढग गडगडायला लागले की गुडगुड म्हातारी आली असं सांगून लहान मुलांना घाबरवलं जातं. पण प्रत्यक्षात ढगांच्या गडगडण्याचं कारण वेगळंच आहे.
advertisement
1/5

पाऊस सुरू झाला की ढग काळे होणं, विजा चमकणं, वारा किंवा वादळ येणं आणि ढग गडगडणं हे सुरू होतं. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असतो.
advertisement
2/5
ढग गडगडायला लागले की बरीच लहान मुलं घाबरतात. कित्येक मोठ्या माणसांनाही गडगडणाऱ्या ढगांची भीती वाटते. पण ढगांच्या गडगडण्याचं कारण माहिती आहे का?
advertisement
3/5
ढगांमध्ये अतिशय सूक्ष्म कणांच्या रूपात आर्द्रता असते. जेव्हा हवा आणि पाण्याच्या कणांमध्ये घर्षण होतं, तेव्हा त्यातून वीज निर्माण होते.
advertisement
4/5
पाण्याचे कण भारित होतात आणि काही प्लस, तर काही मायनस चार्ज होतात. जेव्हा प्लस आणि मायनस चार्ज कणांचे समूह जवळ येतात.
advertisement
5/5
तेव्हा त्यांची टक्कर झाल्यावर वीज निर्माण होते तेव्हा त्यातून आवाज येतो आणि ते चमकतात. प्रकाशाचा वेग जास्त असल्याने विजा चमकलेल्या आधी दिसतात आणि आवाज उशिरा येतो.